मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे : चंद्रकांत भाट

न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी

कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या शैलीदार लेखणीतून मराठी भाषेला सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले त्यामुळे मराठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले या भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले
विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात मराठी राजभाषा दिन तथा कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्सहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार चंद्रकांत भाट बोलत होते
यावेळी उपस्थित संस्थेचे सचिव मेजर के. एम् भोसले खजिनदार कृष्णात पाटील , संचालक सुरेश पाटील पत्रकार बाळासाहेब कांबळे विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली .स्वागत विद्यालयाचे पृथ्वीचंद माछरेकर यांनी केले तर प्रास्ताविक विद्यालयाचे नितिन बागुल यांनी केले. कु. सानिका पाटील हिने कुसुमाग्रजांचे ओंकार लाड साद शेख महेक शेख , हिरकणी कोळी वैष्णवी शिंदे , तहुरा मुल्ला इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार चंद्रकांत भाट यांनी कुसुमाग्रज यांच्या जिवन कार्याची माहिती देतांना विविध दृष्टांत देऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले .मराठी भाषा वाढली पाहिजे तीचा प्रसार व प्रचार झाला पाहिजे असे प्रतिपादन केले .शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मेजर के. एम्. भोसले यांनी केले त्यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन झाले पाहिजे असे प्रतिपादन केले .सुत्रसंचालन सौ जयश्री पाटील यांनी केले. सुप्रिया दाभाडे, सर्जेराव पोवार ,सिद्धार्थ कांबळे , अभिषेक ढोकळे इत्यादींचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.

Spread the love
error: Content is protected !!