“मोठी बातमी” जयसिंगपूर तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

जयसिंगपूर येथील डवरी वसाहतीत असलेल्या प्लॉटच्या क्षेत्रफळातील तफावत दूर करण्यासाठी २७ हजार ५०० रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून दोघांना घेतले ताब्यात स्वप्निल वसंतराव घाटगे,शिवाजी नागनाथ इटलावार अशी त्यांची नाव आहे.जयसिंगपूर सजाचे तलाठी स्वप्निल वसंतराव घाटगे वय वर्षे ३९ (रा.रुकडी ता.हातकणंगले) यांच्याकडे तक्रारदार यांनी तफावत दूर करण्यासाठी अर्ज दिला होता.तलाठी घाटगे यांनी तहसीलदार शिरोळ व कार्यालयातील क्लार्क शिवाजी नागनाथ इटलावार वय वर्षे ३२ महसूल सहाय्यक तहसीलदार कार्यालय शिरोळ (सध्या रा.राजू नायकवडी यांच्या घरी भाड्याने क!! बावडा कोल्हापूर मूळ गाव कुंडलवाडी ता.बिलोली जि.नांदेड) यांच्याकरिता तसेच खाजगी टायपिस्ट यांच्याकरिता तक्रारदार यांच्याकडे २७५०० रु.लाचेची मागणी केली होती.तसेच यातील शिवाजी इटलावार यांनी तलाठी घाटगे यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडे ५००० रु.मागणी केल्याची निष्पन्न झालेने यातील आरोपी घाटगे व इटलावार यांच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई अमोल तांबे पोलीस अधीक्षक (लाप्रवि,पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी सरदार नाळे पोलीस उपअधीक्षक,श्रीमती आसमा मुल्ला पोलिस निरीक्षक,सपोफौं.प्रकाश भंडारे,पोहे.अजय चव्हाण सुरज अपराध,विष्णू गुरव,संदीप पवार,पोना सुधीर पाटील, सचिन पाटील यांच्या पथकाने केली.

Spread the love
error: Content is protected !!