पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
टोप येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त अश्वरिंगण सोहळा संपन्न
टोप येथे हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाची सांगतानिमित्त अश्व रिंगण सोहळा रामकृष्णहरीच्या गजरात भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.टोपमध्ये वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने श्री कल्लेश्वर मंदिर परिसरात १४ ते १६ फेब्रुवारी असे तीन दिवसांचा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रंगला.पहाटे अभिषेक,काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन,हरिपाठ,भजन,प्रवचन व सायंकाळी कीर्तन असे कार्यक्रम झाले.
पारायणाची सांगतानिमित्त उभे रिंगण माळवाडी परिसरात तर टोप हायस्कूल टोप च्या ग्राउंडवरती गोल अश्व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रिंगणासाठी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्व होते.
गुरूवर्य तात्यासाहेब वास्कर महाराज व गुरूवर्य हृषिकेश विठ्ठलराव वास्कर महाराज यांच्या अधिपत्याखाली पारायण सोहळा झाला.पारायण सोहळ्यात हभप गोपाळ आण्णा वासकर, हभप हृषिकेश विठ्ठलराव वास्कर महाराज, बाल कीर्तनकार हभप चैतन्य फुंदे महाराज, हभप गजानन गानबावले महाराज यांचे प्रवचन कीर्तन झाले.
या सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय,ग्रामपंचायत,विविध सहकारी संस्था,दूध संस्था,तरुण मंडळे,महिला बचत गट,पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळे,भक्त, वारकरी, ग्रामस्थ यांचे उपस्थित होते.