कवठेसारची कुमारी शाहिस्ता अब्दुल फकीर यांची सांगली जिल्हात ग्रामीण महसूल अधिकारीपदी नुकतीच नियुक्ती झाली.प्रशासकीय सेवेत दाखल होणारी कवठेसार गावातून पुरुष व महिलांमध्ये ही पहिलीच कन्या आहे.त्यांनी तलाठी भरतीसाठी परिक्षा दिली होती. त्यात त्यांना यश मिळाले.त्यांचा एमपीएससी या स्पर्धा परीक्षेचा ही अभ्यास चालू आहे.उपजिल्हाधिकारी होण्याचं मानस त्यांनी बोलताना व्यक्त केला.
वडील अब्दुल फकीर हे शेतकरी व्यवसायातून असून आपल्या कन्येने चांगल्या अभ्यास करून प्रशासनातून लोकसेवेत राहण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविल्याने समाधान व्यक्त केले.या निवडीबद्दल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने तालुका अध्यक्ष ए जी मुल्ला यांच्या हस्ते आणि तौफिक मुजावर, अमीर घुनके, अल्ताफ इनामदार, जावेद मुजावर, इजाज इनामदार परवेज इनामदार सायरा इनामदार नजमा मुल्ला अमन मुल्ला, समय अब्दुल बादशहा फकीर, काशिम मुलाणी, दादूनशा फकीर,समीर फकीर यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.तर ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सौ जरिना बशीर फकीर यांनी कू शाहिस्ता चां सत्कार केला.यावेळी सरपंच पोपट भोकरे, सर्व सदस्य ग्रामसेवक अतुल कांबळे,तलाठी महादेव रेंगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.