शिरोळ / प्रतिनिधी
विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा उत्सहात संपन्न झाला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे,सचिव मेजर के.एम भोसले, सौ.नम्रता जाधव,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली .स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाच्या शिक्षिका जयश्री पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ मोनिका बलदवा यांनी आपल्या मनोगतातून दहावी बारावी नंतर पुढे काय करायचे मुलांना मार्गदर्शनाची दिशा काय असावी सरकारी नोकरीच्या पुढेही करिअर करण्यासाठी असणारी संधी,शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना सक्षस लवकर प्राप्त होते.याविषयी मौलिक मार्गदर्शन केले
संस्थेचे सचिव मेजर के.एम.भोसले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, या संकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम राबविले जातात असे सांगितले.सुत्रसंचालन नितिन बागुल केले.कार्यक्रमासाठी सुप्रिया दाभाडे सर्जेराव पोवार,सिद्धार्थ कांबळे,अभिषेक ढोकळे पृथ्वीचंद माछरेकर यांचे सहकार्य लाभले.