‘निकृष्ट दर्जाच्या वाळूला काळ्या राखेचा मुलामा’

निकृष्ट दर्जाची वाळू ग्राहकांच्या माथी मारण्याचा उद्योग

जयसिंगपूर / अजित पवार

बांधकामासाठी अत्यावश्यक घटक म्हणून वाळूला प्रथम दर्जा दिला जातो.पण हीच वाळू आता शिरोळ तालुक्यात चढ्या दराने विक्री होऊ लागली आहे.ओढ्या,नाल्यावर गोळा केलेल्या ‘निकृष्ट दर्जाच्या वाळूला काळ्या राखेचा मुलामा’ देऊन उत्कृष्ट दर्जाची वाळू ऐवजी निकृष्ट दर्जाची वाळू ग्राहकांच्या माथी मारण्याचा उद्योग राजरोसपणे विक्री सुरू आहे.जयसिंगपूर शहर आणि परिसरात ही निकृष्ट दर्जाची वाळू स्वच्छ करण्यासाठी मोठे मोठे विनापरवाना प्लांट उभारले आहेत.महसूल विभागाचे याकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.

बांधकाम व्यवसायात वाळू,दगड,वीट,खडी,सिमेंट, दगडापासून बनवलेली क्रश सँण्ड याचा प्रामुख्याने वापर केला जातो.शिरोळ तालुक्यात या व्यवसायात असलेले जयसिंगपूर परिसरात मोठे मोठे व्यवसायिक आहेत. काही वहाणधारक केवळ वाळू विक्रीचा व्यवहार व्यवसाय करतात.काहीजण इतरांकडून घेऊन वाळू विक्री करतात.याचे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर जाळे पसरले आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर येथून येणारी वाळू सुमारे दहा ते अकरा हजार रुपये प्रतिब्रास या दराने विकली जाते. वाळूचा दर्जा अत्यंत चांगला असल्याकारणाने ग्राहकही या वाळूकडे आकर्षित होतो. पण काही व्यवसायिक लगतच्या कर्नाटक राज्यातील नदी, ओढे, नाले यातून गोळा केलेली वाळू ट्रक मधून भरून आणतात. ती वाळू पाण्याने स्वच्छ केली जाते. स्वच्छ करत असताना फाउंड्रीतील वेस्ट असलेली काळी राख यामध्ये मिसळली जाते. यामुळे या वाळूला बेगमपूर वाळू आहे. असे सांगून ग्राहकांच्या माथी मारण्याचा उद्योग सुरू आहे.

 

जयसिंगपूर शहरालगतच्या संभाजीपूर गावाजवळ असलेल्या एका बंद पडलेल्या दगड खाणीतून पाणी उपसा करून ही वाळू स्वच्छ केली जाते. त्याचबरोबर त्यात ही काळी राख मिसळली जाते. ही मिसळलेली वाळू स्वच्छ धुतल्यानंतर काळी भोर नदीचे असल्याचा कांगावा करून ग्राहकांना विकली जाते. बेगमपूर लगत असलेल्या एका नदीतून ही वाळू उचलली असल्याचे भासवून ग्राहकांना दाम दुप्पट भावाने निकृष्ट दर्जाची वाळू विक्री केली जात आहे.

 

महत्त्वाचा मुद्दा

महादेवाचा प्रताप… अजब तुझे सरकार

धरणगुत्ती हद्दीतील एका बंद पडलेल्या दगड खाणीजवळ क्रेशर लगत वाळू स्वच्छ करण्यासाठी ‘महादेवाने’ आपला प्लांट उभारला आहे.या प्लांटवर दिवसातून बरीच वाहने वाळू स्वच्छ करण्यासाठी येतात.यासाठी लागणाऱ्या पाण्याला कोणताही मोबदला द्यावा लागत नाही. तसेच तेथे खनित बसवलेल्या विद्युत मोटारीला राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा केला आहे.विद्युत पुरवठा कोणत्या कागदपत्राच्या आणि कोणत्या व्यवसायाच्या आधारे दिला.याची परिसरात ‘ अजब तुझे सरकार ‘ अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

Spread the love
error: Content is protected !!