गणपतराव पाटील यांचा समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने सत्कार

शिरोळ / प्रतिनिधी

सहकाराच्या माध्यमातून समाजवाद रुजवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याचबरोबर सामाजिक परिवर्तनाची चळवळ गतिशील केली जाऊ शकते. परिसराचा शेतीपासून शिक्षणापर्यंतचा सर्वांगीण विकास करता येऊ शकतो, हे दत्त समूहाचे शिल्पकार,माजी आमदार, कालवश डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून दाखवून दिले.तोच विचार त्यामध्ये अधिक भर घालून गणपतराव पाटील वृध्दींगत करत आहेत ही अतिशय आनंदाची,समाधानाची आणि कौतुकास्पद बाब आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ते श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन, क्षारपड मुक्तीचे जनक, उद्यानपंडित गणपतराव पाटील (दादा) यांना भारतीय शुगर तर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘सहकार महर्षी’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांना समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने शुभेच्छा देताना व्यक्त केले. गणपतराव पाटील यांचा प्रसाद कुलकर्णी यांनी शाल, बुके व ग्रंथ देऊन श्री दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर सत्कार केला. यावेळी निवृत्त गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!