कुरुंदवाड / प्रतिनिधी
गेल्या वर्षीच्या यात्रेचा अर्थसंकल्प मांडत असताना यात्रा समितीचे अध्यक्ष तथा प्रशासक यांच्या विषयी अपशब्द वापरून त्यांच्या बदनामीचा प्रयत्न केल्याचा पालिका कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवत यात्रेच्या कामकाजात भाग घेणार नसल्याचे आणि शहराच्या विकासात्मक कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने यात्रेच्या कामाचा अतिरिक्त भार टाकू नये अशा मागणीचे निवेदन कर्मचाऱ्यांनी दिल्याने.
यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.दरम्यान संभाव्य लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे.त्यामुळे यात्रेच्या अध्यक्षपदावर राहता येणार नाही म्हणून ही राजीनामा देत असल्याचे मुख्याधिकारी चौहान यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
प्रशासक चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,पालिका कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात पालिकेचे कामकाज ऑनलाईन करणे (IWBP),आपला संकल्प विकसीत भारत,प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, नागरीकांना आयुष्यमान कार्डचा लाभ देणे,प्रधानमंत्री आवास योजना तसेच आर्थिक वर्ष संपत असलेने चतुर्थ वार्षिक कर आकारणी सुरु असलेने व त्याच्या वसुलीचे उद्दिष्ट हे मार्च अखेर पुर्ण करणेचे आहे.
त्या संदर्भात वरिष्ट कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.या सर्व कामांकरीता नगरपरिषदेकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने कर्मचारी सकाळी 8 वाजल्या पासुन रात्री उशीरा पर्यंत काम करीत आहेत.अशातच यात्रेच्या कामाचा भार टाकू नये अशी मागणी कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरीक,शहरातील तरुण मंडळांचे अध्यक्ष व सदस्य यांनी एकत्रीत येवून लोकसहभागातून यात्रा मोठ्या प्रमाणावर भरविणे बाबत व शहरातील मंडळाकरवी यात्रा भरविण्याचा योग्य निर्णय झाला आहे.
याबाबत पालिकेचा कोणताही आक्षेप नाही आणि कोणताही हस्तक्षेप आणि संबंध राहणार नाही असे स्पष्ट करत यात्रा स्थळाच्या ठिकाणची आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागाच्या सोयी-सुविधा पालिका प्रशासन पुरवठा करण्यात कमी पडणार नसल्याचे सांगितले.