पंचगंगेवरील बंधार्‍यात मृत मासे नेण्यासाठी उडाली झुंबड

मृत मासे खाणे आरोग्यास धोकादायक

शिरोळ / प्रतिनिधी

गेल्या पंधरा दिवसात पंचगंगा नदीत अंत्यत रासायनिक व अँसिडयुक्त प्रदुषित व काळेकुट्ट पाणी येत असल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे.

 

त्यामुळे नांदणी,धरणगुत्ती,शिरोळ परीसरात पंचगंगा नदीच्या पात्रात मृत माशांचा खच पडला आहे.सदरचे मृत माशे नेण्यासाठी पंचांगा नदीवर झुंबड उडाली आहे सदरचे मृत मासे खाणे आरोग्यास धोकादायक असल्याचे माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे तरीही मासे नेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

 

गेल्या पंचवीस वर्षापासून शिरोळ तालुकयात पंचगंगा नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.गांधीनगर पासून पंचगंगा नदी काठावर असणाऱ्या औद्योगिक वसाहतमधील इचलकरंजी शहरातील प्रोससेचे रासायनिक व अँसिडयुक्त विविध गावचे सांडपाणी पंचगंगा नदीत थेट मिळत असल्याने नदीचे पाणी काळेकुट्ट होवून पाणी प्रदुषित होते.

 

परीणामी नदीतील माशासह सर्व जलचर प्राणी मृत्यूमुखी पडतात.या दुषित पाण्यामुळे शिरोळ बंधार्‍यात मृत माशांचा खच पंचगंगा नदीच्या पात्रात पडला आहे. विषारी पाणी पिल्याने माशांचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात आहे सदरचे मृत मासे खाणे आरोग्यास

 

धोकादायक आहे तरीही माशे नेण्यासाठी पंचगंगा बंधाऱ्यावर मोठी झुंबड उडाली आहे.सदरचे मासे आरोग्यास हानिकारक असल्याने या माशांची विक्री होऊ नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे.तरीही माशे नेण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे.

Spread the love
error: Content is protected !!