श्वेतप्रदर (व्हाईट डिस्चार्ज)ला कंटाळला आहात? मग करा हा आयुर्वेदिक उपचार

अंगावरून पांढरट, घट्ट,दुर्गंधीयुक्त असा स्त्राव योनीमार्गातून निघतो यालाच “श्वेतप्रदर “म्हणतात.यामध्ये कफ दोष दुष्टी होते.

लक्षणे –
खाज, घाणेरडा वास येणे, अंत वस्त्रांवर पांढरे डाग पडणे, ताप, ओटी पोटात दुखणे,थंडी, अशक्तपणा हि सामान्यत: लक्षणे असतात.

अपथ्य (खाऊ नये )- कफ पित्त कारक आहार, दही, उडीद, पापड, ऊस, गूळ, ताक, वांगी, तिळ, मोहरी, लवंगा, काळी मिरी, चहा, तूर डाळ, मुळा, अळू, कोल्ड्रिंक, साधे मीठ, पोहे, काजू, शेंगा, वाळलेले खोबरे, ग्रेव्ही, थंड पाणी, मैदा,फणस, नॉनव्हेज

पथ्य (खावे )-
ज्वारीच्या कन्या, ज्वारीच्या लाह्या, दुधूभोपाळा, पडवळ, दोडका, सैंधव मीठ, काकडी, बिट, गाजर, लसूण, कांदा, जिरे, धने, दालचिनी, वेलदोडा, ज्वारीची भाकरी, ढबू मिरची, शेवगा, घेवडा, मूग डाळ, गवारी, भेंडी, लाल भात, कोमट पाणी, कारले, लिंबू, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू.

आयुर्वेदिक उपचार व औषधी –
वमन, विरेचन, लंघन, योनीधूपण.

आयुर्वेदिक औषधी –
पत्राँगासव,अशोकारिष्ठ, पुष्यानुग चूर्ण.
उपाय –
1) दिवसा झोपू नये व रात्री जागरण करू नये.
2) शिळे व अंबवलेले पदार्थ टाळावेत
3) वेखंड, जायफळ, वेखंड,भीमसेनी कापूर, कडुलिंब, निलगिरी पाने, सुंठ, हळद, काळी मिरी एकत्र करून “योनी धूपन “करावे.
4) योनी मार्ग गोमूत्र अर्कने दिवसातून 3वेळा धुवून घ्यावा.
5) तुरटी व टंकण घालून पाणी गरम करावे व त्यापाण्याने योनी मार्ग धुवून घ्यावा यामुळे जंतू संसर्ग कमी होतो.
6) अशोक, सारिवा, लोध्र,यस्टीमधू, मुस्ता, आमलकी, वंग भस्म, शुद्ध गंधक,बोल पर्पटी एकत्रित करून गरम पाण्यातून दिवसातून 2वेळा घ्यावे.
7) कडुलिंबाचा रस पिणे.
8) आतील वस्त्रे कायम स्वच्छ ठेवावीत, ओली कपडे घालू नयेत.
9) रात्री झोपताना गरम कडुनिंबाच्या तेलामध्ये कॉटन पॅड बुडवून ते कॉटन पॅड (रोल्ड गॉज ने गुंडाळलेला कापसाचा बोळा )योनीत रात्रभर ठेऊन, तो सकाळी काढावा, यामुळे इन्फेकशन खूप कमी होते व खाज, इतर त्रास कमी होतो.
10) शोक, राग, चिंता या भावनांचा देखील शरीरावर विपरीत परिणाम होत असतो, त्यामुळे भावना कंट्रोल कराव्यात /दिवसातून किमान 15मिनिटे मेडिटेशन करावे.
11) भद्रासन, सर्वांगासन,धनुरासन,वज्रसन,
भुजंगासन हे योगाभ्यास नियमितपने करावेत.
12) या विकारामध्ये आपण आरोमा थेरपी व ॲक्युप्रेशरचा देखील उपयोग करून घेऊ शकता.

डॉ. ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340

Spread the love
error: Content is protected !!