हत्तीच्या पायासारखा जाड पाय होणे, रोगी कुठे हिंडू फिरू न शकणे यालाच “हत्तीरोग “म्हणतात.
यामध्ये कफ दोषामुळे रक्त व मांस दुष्टी होते.
लक्षणे –
सूक्ष्म कृमी लसिका वाहिन्यातून निघतात, डोकेदुखी, ताप,थंडी,हळू हळू पाय व जननेंद्रीय सुजने, वेदना हि सर्व लक्षणे दिसून येतात.
अपथ्य (खाऊ नये )-
कफकारक आहार, बटाटा, रताळी, रक्त खराब करणारे पदार्थ, पोहे, काजू, शेंगदाणे, वाळलेले खोबरे, ग्रेव्ही, तिळ, दूध व दुधाचे पदार्थ, नॉनव्हेज, साधे मीठ, गूळ, उसाचा रस, भात,मुळा, अतिगोड पदार्थ,अळू, कोल्ड्रिंक,थंड पाणी.
पथ्य (खावे )-
लाल भात, पपई, स्टॉबेरी, अननस, डाळिंब, कारले, लसूण, मूग, शेवगा, बिट, गाजर, फ्लॉवर, दुधीभोपळा, पडवळ, दोडका, घेवडा, ढबू मिरची, भेंडी, गवारी, ज्वारीच्या कन्या, राजगिरा लाडू,ज्वारीची भाकरी.सुंठ, हळद, कोमट पाणी.
आयुर्वेदिक उपचार व औषधी –
वमन, विरेचन, लंघन, स्वेदन, रक्तमोक्षण.
औषधी -श्लीपद गजकेसरी रस, नित्यानंद रस,सप्तांग गुग्गुळ.
उपाय –
1) शुद्ध पाणी /पाणी उकळून प्यावे.
2) कुटज, विडंग, हरितकी, गुडूची, मंजिष्ट, शंख भस्म एकत्रित गरम पाण्यातून 2चमचे दिवसातून 2वेळा घ्यावे.
3) कडुलिंबाचा रस प्यावा.
4) गोमूत्र अर्क देखील या आजारात इफेक्टिव्ह आहे.
5) ढासांपासून काळजी घेणे (मच्चरदाणी वापरणे )
6) AC /फॅन वापरू नये, थंडी पासून काळजी घ्यावी.
7) पायाला धतुरा, एरंडमूळ, आंबेहळद, निर्गुण्डी, पुनर्नवा हे सर्व मोहरी तेलात गरम करून, गरम असतानाच याचा लेप पायाला बांधल्याने याचा फायदा होतो.
8) विपरीतकरणी आसन, गरुडासन,उत्कटासन, त्रिकोणासन हे योगाभ्यास नियमितपने करावेत.
9) दररोज एक चमचा एरेंडेल तेल घेतल्याने चांगला फायदा होतो, कारण एरेंडेल तेल कृमीनाशक, वात कफनाशक आहे.
10) ॲक्युपंक्चर चिकित्सा यात असरदार आहे.
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340