आजार यायचा नसेल तर फॉलो करा हि “दिनचर्या”

1) सकाळी 5 वाजता उठणे
2) पंचगव्य नस्य दोन्ही नाकात टाकणे व 5 मिनिटे तसंच पडून राहणे
3) एक तांब्याभर कोमट पाणी पिणे व एक तास काही खाऊ नये.
4) संपूर्ण अंगाला तेल लावणे.
5) सूर्यनमस्कार -नमस्कारमुद्रा(ॐ मित्राय नमः ),हस्त उत्तनासन(ॐ रवये नमः),पाद हस्तासन(ॐ सूर्याय नमः),अर्धचंद्रासन(ॐ भानवे नमः), पर्वतासन(ॐ खगय नमः),अष्टांगासन(ॐ पुष्णे नमः) ,भुजंगासन(ॐ हिरण्यगर्भाय नमः),शशांकासन(ॐ मारिचाये नमः) ,पर्वतासन(ॐ आदित्याय नमः), अर्धचंद्रासन(ॐ सावित्रे नमः),पाद हस्तासन(ॐ अर्काय नमः),हस्त उत्तानासन(ॐ भास्कराय नमः) या प्रकारे मंत्रासहित घालावेत.
6) मग कोमट पाण्याने, मसूर डाळीच्या पिठाने शरीर घासून अंघोळ करावी.
सकाळी 8 वाजता –
ज्वारीच्या कन्या खाव्यात.खजूर,राजगिरा लाडू व बदाम -मनुके खावेत
दुपारी 1 वाजता –
दुपारचे जेवण करावे.दुपारीच्या जेवनामध्ये काकडी,बिट,गाजर,मुगडाळ,ज्वारीची भाकरी, देशी गाईचे तूप,मूग डाळीचे वरण-भात, दुधीभोपळा,पडवळ,दोडका,कारले,मेथी,पालक, भेंडी,गवारी,घेवडा,शेवगा,ढबू मिरची यापैकी भाज्या, बिन पॉलिशचा भात व जेवणानंतर लसूण व जिरेयुक्त ताक अवश्य घ्यावे.अर्ध्या तासाने कोमट पाणी प्यावे.
संध्याकाळी 4 वाजता –
मोसंबी,संत्री,डाळिंब,पेरू,राजगिरा लाडू,नारळ पाणी,थालीपीठ खावे.
रात्री 8 वाजता –
ज्वारीची भाकरी,दुपारीप्रमाणे सेम जेवण.दुपारी व रात्री जेवनामध्ये सैंधव (उपवासाचे मीट )वापरावे. रात्री ताक घेऊ नये.जेवना नंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी घ्यावे. व एक तासाने चालावे.
रात्री 9.30 वाजता –
दोन्ही नाकामध्ये पंचगव्य नस्य टाकावे, डोक्याला व तळपायाला खोबरेल तेलाने हलकीशी मालिश करावी.बेंबीमध्ये बदाम तेल मुरवावे व कानटोपी घालून झोपावे. असे केल्यास निद्रानाश दूर होतो.
अशी दिनचर्या फॉलो केल्यास आरोग्य उत्तम राहते 

डॉ.ओंकार अशोक निंगनुरे

कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340
Spread the love
error: Content is protected !!