अपुरी झोप ही दुःख,अशक्तपणा,सुस्ती, अल्पायुष्य अशा व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. आयुर्वेदानुसार एक सामान्य,निरोगी व्यक्तीस सहा तासांची झोप पुरेशी आहे.म्हणूनच पित्त आणि कफ कारक प्रकृतीच्या लोकांनी सहा तासांच्या झोपेची सवय करून घेतल्यास ते निरोगी राहतील.
डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे
1) रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
2) पचन लवकर होते त्यामुळे गॅस होत नाही. 3) शरीराचा थकवा घालविण्यासाठी डाव्या उशीवर झोपणे अधिक चांगले असते.
4) हार्ट अटॅक चा धोका कमी असतो.
5) कंबरेचा दुखावा पण कमी होतो.
6) मुलांनी/मुलींनी डाव्या कुशीवर झोपल्याने स्मरण शक्ती वाढते.
व्यक्तिगत कामकाजानुसार झोपेची गरज वेगळी असू शकते.व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाच्या शारीरिक,मानसिक,बौद्धिक गरजेनुसार झोपेची मात्रा ठरत असते.जे सतत खूप शारीरिक श्रम करतात.जे लोक इतरांच्या संपर्कात येऊन बोलत असतात,जसे सल्लागार,डॉक्टर,वकील, मार्केटिंग व्यवसाय,अध्यापक इ.बौद्धिक कार्य करणारे जसे निर्णय घेणारे,योजनाकार, प्रशासकीय अधिकारी,आयोजन करणारे इ.
टेबलवर बैठे काम करणारे,जसे कारकून, अकाऊंटंट,कॉम्पुटर हाताळणारे. जे लोक खूप कमी व हलके काम करतात.
झोप शांत लागण्यासाठी उपाय,गाढ निद्रेसाठी
रात्रीच्या झोपेसाठी संस्कृतमध्ये ‘भुतधात्री’ असा शब्द आहे,ज्याचा अर्थ आहे ‘संपूर्ण चराचराची माता’.ज्या प्रकारे आई आपल्या बाळाचे पालन पोषण करते त्या प्रमाणे ही सृष्टी आपल्याला निद्रा काळात विश्रांती देऊन एक प्रकारे पोषणच करीत असते. रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग असलेली ही निद्रा आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते.
झोपण्याचे प्रकार
निद्रेचे सात भागात वर्गीकरण
तमोभाव – तामसिक वृत्तीमुळे निद्रा.
श्लेष्मासमूदभवा – शरीरात कफ वाढल्यामुळे येणारी निद्रा.
मन: श्रम जानया – मानसिक थकव्यामुळे येणारी निद्रा.
शरीर: श्रम जानया – शारीरिक थकव्या मुळे येणारी निद्रा.
अग्नटूकी – बाह्य कारणामुळे येणारी निद्रा. उदा. अपघात,विषारी पदार्थ इ.
व्याध्यानूवर्तनी – आजारामुळे येणारी निद्रा. उदा. ताप,डायरिया,मधुमेह,मद्यपान इ.
रात्रिसवाभवा – रात्री नैसर्गिकरित्या येणारी झोप.
या सर्व झोपेच्या प्रकारात केवळ रात्रिसवाभवा ही सामान्य निद्रा असून त्यालाच ‘भुतधात्री’ असे म्हटले जाते.
साधारणतः आपणास किती झोपेची गरज आहे?
०-७ वर्षे १०-१२ तासाची झोप
७-१४ वर्षे ८-१० तासाची झोप
१४-२१ वर्षे ६-८ तासाची झोप
२१-३५ वर्षे ५-६ तासाची झोप
३५-५० वर्षे ४-५ तासाची झोप
५० हुन अधिक वर्षे ४ तास किंवा त्याहून कमी
सामान्यतः वात प्रकृतीच्या लोकांना ५ ते ६ तासांची झोप पुरेशी आहे. पित्त प्रकृतीचे लोक गाढ आणि विना अडथळ्याच्या ६ ते ७ तासांच्या झोपेने तंदुरुस्त राहतात. कफ प्रकृतीच्या लोकांना ७ ते ८ तास झोपायला आवडते. कारण त्यांच्या तब्येतीनुसार ८ किंवा त्यापेक्षा जास्त तासांची झोप त्यांच्यासाठी योग्य आहे. पण इतकी जास्त झोप काढणे बरे नव्हे.