प्रो कबड्डीतील अधिकारी पंचांची दत्त कारखान्यास सदिच्छा भेट
शिरोळ / प्रतिनिधी
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास प्रो कबड्डी या क्षेत्रातील टेक्निकल अधिकारी व पंचांनी सदिच्छा भेट दिली.प्रो कबड्डीचे टेक्निशन डायरेक्टर ई प्रसाद राव,टेक्निकल सुपरवायझर श्री नटराजन,विश्वास मोरे,मैत्री मॅडम,प्रो कबड्डीचे संयोजक व मशाल स्पोर्ट्सचे अधिकारी ओंकार प्रभू,स्टार स्पोर्ट्स टी व्हीचे अधिकारी राहुल सर आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक डॉ.रमेश भेंडीगिरी व पंचांनी शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली
आलेल्या सर्व मान्यवरांचा श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी इ प्रसाद राव बोलताना म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कबड्डी खेळा रुजलेला आहे.
हा कबड्डी खेळ वाढवण्यासाठी माजी आमदार स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील,उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे फार मोठे योगदान आहे.
तसेच शेतीतील निर्जीवमातीला सजीव करण्याचे ऐतिहासिक कार्य गणपतराव पाटील यांनी केले आहे.श्री नटराजन व विश्वास मोरे हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मातीतील कबड्डी या खेळाला उभारी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी मदत गणपतराव पाटील यांनी करून कबड्डीला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.
यावेळी प्रो कबड्डी टेक्निशन अधिकारी व स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी ई प्रसाद राव व राहुल सर यांनी गणपतराव पाटील यांचा सत्कार केला.प्रो कबड्डीचे उपस्थित सर्व पंच या सत्कार समारंभावेळी भारावून गेले.गणपतराव पाटील बोलताना म्हणाले आपल्या ग्रामीण भागामध्ये कबड्डी खेळाचा अधिक प्रसार होण्यासाठी प्रो कबड्डी सारखे स्पर्धा किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आहे.
या स्पर्धा घेण्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून कबड्डी खेळासाठी सर्वांना मदत करण्याचे ग्वाही दिली.
यावेळी प्रो कबड्डीचे सर्व पंच,शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,श्री दत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील,सचिव अशोक शिंदे,
तसेच कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी अजित पाटील, शहाजान शेख,कुबेर पाटील,जांभळी क्रीडा मंडळाचे सोपान कदम भाऊसाहेब पाटील,अरुण पाटील,अरुण कांबळे, बाल शिवाजी मंडळाचे पदाधिकारी अमित उर्फ बंटी संकपाळ उपस्थित होते.स्वागत अण्णासाहेब गावडे यांनी केले.
दत्तचे कामगार युनियन अध्यक्ष व कबड्डी पंच प्रदीप बनगे यांनी आभार मानले.सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले.