‘दिगंबरा दिगंबरा श्रीपदा वल्लभ दिगंबरा’ अशा जयघोषात
कृष्णातीरी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंती सोहळा साजरा होतोय,पहाटेपासून दत्त मंदिर परिसरात हजारो भाविक दाखल झालेत,मंदिर परिसर आज भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्याच पहायला मिळाल.तर श्रीदत्त जन्मकाळ सोहळा संध्याकाळी 5 वाजता मुख्य मंदिरात पार पडणार आहे. तरी,जन्मकाळ सोहळ्यासाठी सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंतीचा सोहळानिमित्त महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा, गुजरात,आंध्रप्रदेश आदी राज्यातील हजारो भाविकांनी दत्त दर्शनासाठी या पवित्रक्षेत्री हजेरी लावतात.श्री दत्तात्रयाचे द्वितीय अवतार श्री नृसिंह-सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपश्चर्येने पावन झालेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गेल्या दहा दिवसांपासून दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते.आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जन्मकाळ असल्याने पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून भाविकांचा ओघ दत्त दर्शनासाठी येत होता.अवघी नृसिंहवाडी भाविकांच्या गर्दीेने फुलली होती.आज उत्सावाच्या मुख्य दिवशी काकड आरती, प्रात:कालीन पूजा,पंचामृत अभिषेक,श्री चरणांची कमल महापूजा, पवमान पंचसुक्त पठण आदी कार्यक्रम पार पडत आहेत.तर, दुपारी वस्त्रालंकाराने सजवलेली श्रीं ची उत्सवमूर्ती सवाद्य मिरवणुकीने निघणार आहे. सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार आहे.येणाऱ्या भाविकांना श्री दत्तप्रभू चे दर्शन व्हावे यासाठी उत्तर बाजूने रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ रोहिणी सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ,जयसिंगपूर, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचा पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला.तसेच कृष्णा नदी काठावर वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात करण्यात आले आहे.भाविकांच्या गर्दीच्या अनुसंघाणे नृसिंहवाडी ग्रामपंचायत,श्री दत्त देवस्थान ट्रस्ट परिश्रम घेत आहेत.