नृसिंहवाडी / प्रतिनिधी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या गेटवर समोरच्या बाजूस खासदर धैर्यशील माने व इतर व्यवसायिक यांचे डिजिटल फलक लावण्यात आल्यामुळे सदरचे आरोग्य केंद्र झाकून गेले होते.त्यामुळे ऐन दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना आरोग्य केंद्राची शोधा-शोध करावी लागत असल्याने. सदरचा डिजिटल फलक काढवा अशी मागणी मुंबई, गोवा,कर्नाटक राज्यातील जेष्ठ भविकातून होत होती. दत्तजयंतीनिमित्त दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी भाविकांच्या सेवेसाठी येथील आरोग्य केंद्राचे पथक सज्ज आहे. मात्र, आरोग्य केंद्राच्या गेट समोरचा खासदार व ग्रामपंचायत व व्यवसायिक डिजिटल फलकात झाकून गेल्याने रुग्णांना आरोग्य केंद्र शोधून सुद्धा सापडत नाहीये,अशी परिस्थिती निर्माण झाली होती. राजकीय पक्ष,व्यवसायासह काहीजणांनी डिजिटल बोर्ड लावल्याबद्दल संताप व्यक्त केला जात असल्याने अडचणींचा ठरणारा खासदार धैर्यशील माने व इतर व्यवसायिक यांचा डिजिटल फलक काढल्याने येणाऱ्या भाविकांची होणारी गैर सोय दूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.तसेच आरोग्य केंद्रानेही डिजिटल फलकाच्या विळख्यातून मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले.