पहिली उचल ५ हजार रूपये देऊ ; जिल्हातील कोणताही साखर कारखाना अंकुशला चालवायला द्यावा धनाजी चुडमुंगे यांचे साखर कारखानदारांना खुले आवाहन 

Spread the love

ऊस दराचा तोडगा बैठक बंद खोलीत न होता छ.शिवाजी तख्तात शेतकऱ्यांसमोर होईल – धनाजी चुडमुंगे

ऊस दर जाहीर करा, मगच कारखाने सुरू करा 

ऊसाला पहिली उचल ५ हजार : मागील दुसरा हप्ता ३०० रूपयाची एल्गार सभेत मागणी

शिरोळ / संदीप इंगळे 

सद्याची दुष्काळ परिस्थिती आणि साखरेचे व उपपदार्थांचे वाढलेले दर पाहता शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसाला योग्य व परवडणारा दर मिळायला हवा याकरीता आंदोलन, उपोषणे व रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. यावर्षी ऊसदराचे धोरण शेतकऱ्यांना पटवून देण्याची भूमिका घेतली आहे.देशाच्या ७० वर्षाच्या इतिहासात प्रथम साखरेचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे बाजारात साखरेचे दर ५० रूपयाच्यावर आहेत. उपपदार्थांना मिळणारा दर पाहता यावर्षी ऊसाला पहिली उचल ५ हजार रूपये आणि गत हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला दुसरा हप्ता ३०० रूपये मिळालाच पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. सरकार आणि साखर कारखानदार साखरेचा तुडवडा असल्याचे सांगून साखर कारखाने लवकर सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण साखर कारखानदारांनी पहिल्यांदा ऊस दर जाहीर करूनच कारखाने सुरू करावेत अशी भूमिका आंदोलन अंकुशची असून यावर्षी ऊस दराची चर्चा शिरोळच्या छ. शिवाजी महाराज तख्तामध्येच शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाईल, अशी घोषणा आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी एल्गार सभेत केली.

येथील छ.शिवाजी चौकात आंदोलन अंकुशची ९ वी एल्गार सभा रविवारी सायंकाळी संपन्न झाली. या सभेत आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यपध्दतीवर सडकून टिका केली. आंदोलन अंकुशचे अमोल गावडे यांनी स्वागत करून आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.

या एल्गार सभेत बोलताना धनाजी चुडमुंगे पुढे म्हणाले की, साखरेपासून इथेनॉल निर्मितीमुळे साखर टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे साखरेचा तुडवडा जाणवू नये याकरीता सरकार लवकर साखर कारखाने सुरू करण्यास भाग पाडत आहेत. देशातील उत्पादन झालेल्या साखरेतील २० टक्के साखर ही जीवनावश्यक व्यवस्थेत वापरली जाते तर ८० टक्के साखर विविध उद्योगात वापरली जात असल्याने यावर्षी साखरेला उच्चांकी दर मिळण्याची शक्यता आहे. याचा शेतकऱ्यांनी गांभिर्याने विचार करावा. याचबरोबर सद्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ऊस उत्पादनात घट होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ऊस दर वाढवून घेतला पाहिजे.ऊस दर मागणी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे.त्यांना परवडेल असा दर देणे ही कारखान्याचे विश्वस्त म्हणून संचालक मंडळाची जबाबदारी आहे.साखरेचे दर ऊसापासून निर्माण होणाऱ्या उपपदार्थाला मिळणारे दर पाहता यावर्षी उसाला पहिली उचल ५ हजार रूपये मिळालेच पाहिजे, अशी भूमिका शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.पण काही साखर कारखानदार कारखाना तोट्यात आहे असे वारंवार सांगत आहेत.अशा कारखानदारांना माझे खुले आवाहन आहे, तो साखर कारखाना आंदोलन अंकुशला चालवायला द्यावा, शेतकऱ्यांना पहिली उचल ५ हजार रूपये देवून गाळप हंगाम संपल्यानंतर सर्व हिशोब पूर्ण करून शेतकऱ्यांना अधिक रक्कम देण्याची जबाबदारी निश्चित व प्रामाणिकपणे पार पाडली जाईल.साखर कारखानदारांनी पाडलेला ढपला निवडणुकीत उपयोग करत आहेत.मात्र कारखाने तोट्यात नाहीत. साखरेच्या बाजारातील दरावरच ऊसाचे दर ठरवले जातात. त्यामुळे सद्याच्या परिस्थिीत साखरेला ५० रूपयाच्यावर दर मिळणार आहे. इथेनॉल, कंपोस्ट, मोलॅशिस, बगॅस, प्रेसमड यासह अन्य उपपदार्थांनाही चांगला दर मिळत असल्याने यावर्षीच्या उसाला ५ हजार रूपये दर मिळणे अपेक्षित आहे. ऊस दराचा तोडगा काढणारी बैठक बंद खोलीत न होता छ. शिवाजी तख्तात शेतकऱ्यांसमोरच दर जाहीर केला जाईल. साखर कारखानदार व सरकाराच्या विरोधात यावर्षीची उस दराची लढाई होणार असल्याने ही लढाई कठीण आहे.शेतकऱ्यांनी जोपर्यंत दर जाहीर होत नाहीत.आपल्या ऊसाला हात लावू द्यायचा नाही असा निश्चय करून ऊसतोडी स्विकारू नये. शेतकऱ्याच्या घामाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन अंकुशच्या सुरू असलेल्या लढ्याला पाठबळ द्यावे.शेतकऱ्यांना परवडणारा दर घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा विश्वास चुडमुंगे यांनी व्यक्त केला.

आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील म्हणाले की, ऊस उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. पण ऊसदरात म्हणावी तशी वाढ झाली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. याचा गांर्भियाने विचार करण्याची वेळ आली आहे.साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचा आर्थिक शोषण करून गोकुळ दूध संघ आणि कंडीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी खर्च करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या उसाला योग्य मोबदला मिळावा याकरीता आपल्याला रस्त्यावरची लढाई करणे भाग आहे. सद्याची परिस्थिती पाहता साखर व उपपदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे उसाला पहिली उचल पाच हजार रूपये मिळावी. मागील ३०० रूपयाचा दुसरा हप्ता मिळावा याकरीता रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील पण उसाला दर घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. शेतकऱ्यांनी कोणत्याही साखर कारखान्यांची उसतोड स्विकारू नये.आंदोलन अंकुशच्या लढ्याला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना राकेश जगदाळे म्हणाले की, गेल्या २० आंदोलन वर्षापासून अंकुशच्यावतीने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी प्रामाणिकपणे लढाई करीत आहे. याकरीता आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखानदाराचे समर्थक गावगुंडांचा मार ही सहन केला आहे. पण शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका कधीच सोडली नाही.याउलट साखर कारखानदार नेहमीच शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणुक करीत आहेत.आपल्या शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक शोषण थाबविण्यासाठी शेतकऱ्यांची पोरे रस्त्यावरची लढाई करीत आहेत. अनेक कारखानदारांचे आमदार,खासदार व लोकप्रतिनिधी म्हणून मिरवत आहेत.त्यांनी शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र ते होताना दिसत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांना चळवळीतून व आंदोलनातून ऊस दर मिळवावा लागतो. यावर्षी उसाला सोन्यासारखा दर मिळणार आहे.शेतकऱ्यांनी संयम राखावा. ऊसाचा दर ठरल्याशिवाय कांड्याला हात लावू देवू नका असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष उदय होगले,शिरोळ शहराध्यक्ष अक्षय पाटील, कृष्णा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.दानोळीची कन्या कु.साक्षी बाबर हिने आपल्या परखड मनोगतातून शेतकऱ्यांची व्यथा व्यक्त केली.यावेळी आंदोलन अंकुशचे तालुकाध्यक्ष नागेश काळे,जितेंद्र चौगुले,धनंजय महाडिक युवा आघाडीचे जोतिराम जाधव, शंकर बिराजदार, एकनाथ माने,संभाजी माने, महादेव काळे,पोपट संकपाळ यांच्यासह ऊस उत्पादन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लवकरच रिकव्हरी केंद्र सुरू करणार

आंदोलन अंकुशच्या माध्यमातून हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसाची रिकव्हरी काढण्यासाठी केंद्र उभारण्यात येणार आहे. ८० टक्के निधी जमा झाला आहे. त्यामुळे आता किती रिकव्हरीचा ऊस कारखान्याला पुरवठा होत आहे याची माहिती शेतकऱ्यांना समजणार आहे. त्यामुळे रिकव्हरी चोरीला आळा बसणार असून लवकरच हे केंद्र सुरू करण्यात येईल असेही सांगण्यात आले.

असे लोकप्रतिनिधी काय कामाचे

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे लाखो रूपये खर्च करून २२० हून अधिक गोकुळचे ठरावधारक माझ्याकडे आहेत असे सांगून ठरावधारकांची बडधास्त करत आहे. याच्यासाठी करत असलेला खर्च हा आला कठून असा सवाल उपस्थित करून गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाला १०० रूपये देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. पण निवडणुकीत खर्च करण्यासाठी कोठ्यावधी रूपये त्यांच्याकडे आहेत. असे लोकप्रतिनिधी काय कामाचे असा आरोप जिल्हाध्यक्ष दिपक पाटील यांनी केला.

शरद साखर कारखान्याने मागील गाळप हंगामातील १०० रूपये दिले नाहीत.गुरूदत्त शुगर्सने मागील हंगामातील २५ रूपये अद्यापही शेतकऱ्यांना दिले नाहीत.साखर कारखानदार शेतकऱ्यांची आर्थिक कुंचबणा करून मिळवलेला पैसा निवडणुकीत खर्च करीत आहेत.आपल्या पोराबाळांना आलिशान गाड्या घेवून देत आहेत.पण शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर देण्यासाठी ते पुढाकार घेत नाहीत हिच शोकांतिका असल्याचे राकेश जगदाळे यांनी सांगितले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष उदय होगले,शिरोळ शहराध्यक्ष अक्षय पाटील, कृष्णा देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.दानोळीची कन्या कु.साक्षी बाबर हिने आपल्या परखड मनोगतातून शेतकऱ्यांची व्यथा व्यक्त केली.यावेळी आंदोलन अंकुशचे तालुकाध्यक्ष नागेश काळे,जितेंद्र चौगुले,धनंजय महाडिक युवा आघाडीचे जोतिराम जाधव, शंकर बिराजदार, एकनाथ माने,संभाजी माने, महादेव काळे,पोपट संकपाळ यांच्यासह ऊस उत्पादन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलन अंकुश संघटनेच्या ऊस एल्गार सभेतील ठराव

१) गत हंगामात तुटलेल्या उसास दुसरा हप्ता म्हणून ३०० रुपये द्यावेत.

२)चालूला पहिली उचल ५००० रुपये जाहीर करूनच कारखाने सुरु करावेत.

३)बाजारातील साखरेच्या दरावर उसाचा दर बांधून द्यावा. 

४) उसाच्या भरलेल्या वाहनाची स्वतंत्र वजन पावती शेतकऱ्यांना द्यावी. 

५) वजन काटायावर वाहनातच रिकव्हरी काढणारे केन सॅम्पलर मशीन कारखान्यांना बसवणे बंधनकारक करावे.

६) किलोमीटरच्या अंतरानुसार तोडणी वाहतूक आकारावी. 

७) मशीन तोड वजावट ४% ऐवजी १% करावी. 

८) एंट्री खुशालीला दंडनीय अपराध घोषित करावा. 

९) उसाची तोड क्रमपाळी नुसार करावी आणि क्रमपाळीनुसार रजिस्टर ग्रामपंचायत व गाव चावडीत सार्वजनिक करावे 

१०) कर्नाटकच्या धर्तीवर ऊस पीक कर्ज बिनव्याजी मिळावे. 

११) कोयना धरणातील पाणी साठ्यावर पहिला हक्क सिंचनाचा असल्यामुळे यावर्षी विज निर्मिती बंद ठेवून ते पाणी सिंचनास द्यावे.

Leave a Comment

error: Content is protected !!