सागर बेग व शिवसेना नगरसेवक आकाश बेग यांना पोलीस संरक्षण देण्याची सकल हिंदू समाज पुलाची शिरोली यांची मागणी

Spread the love

सकल हिंदू समाज पुलाची शिरोली यांची मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग व शिवसेना नगरसेवक आकाश बेग यांना पोलीस संरक्षण देण्याची सकल हिंदू समाज पुलाची शिरोली यांची मागणी

 

 पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग आणि शिवसेना नगरसेवक आकाश बेग यांना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याच्या तसेच घरावर बॉम्बहल्ला करण्याच्या गंभीर धमक्या मिळत असल्याने त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

दिनांक २२ मे २०२६ रोजी श्रीरामपूर येथील त्यांच्या निवासस्थानाची संशयास्पद रेकी करण्यात आल्याचा प्रकार घडला असून, त्यानंतर परदेशातून सोशल मीडियावरून उघडपणे धमक्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला असला तरी धमक्यांचे सत्र अद्याप सुरू असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.

सागर बेग आणि आकाश बेग हे अनेक वर्षांपासून हिंदुत्व, सामाजिक जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता आणि विविध सामाजिक विषयांवर राज्यभर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या सार्वजनिक दौऱ्यांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस प्रशासनाकडे सविस्तर निवेदन सादर करून तात्काळ Threat Assessment करून दोन्ही नेत्यांना योग्य दर्जाचे पोलीस संरक्षण उपलब्ध करून देणे, त्यांच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना आवश्यक पोलीस बंदोबस्त देणे तसेच संबंधित धमक्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने या प्रकरणात तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

उपस्थित पदाधिकारी

संदीप पोरलेकर (भाजप शहर प्रमुख )प्रशांत कागले (विश्व हिंदू परिषद बजरंग दल)अक्षय पवार, जयराज अनुसे, सागर मोरे, सागर पाटील, रवींद्र नार्वेकर, राकेश चौगुले, मल्लिकार्जुन मुडशी, विवेक सावंत, मयूर करपे ,मनोज करपे, प्रमोद पाटील (शहर प्रमुख शिवसेना)

Leave a Comment

error: Content is protected !!