हेरवाड येथील श्री हालसिद्धनाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात; १० लाखांचा निधी मंजूर

Spread the love
हेरवाड / प्रतिनिधी
हेरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामदैवत श्री हालसिद्धनाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा बुधवारी धार्मिक वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मंदिर परिसरात सकाळी विधीवत पूजा, कलश स्थापना, श्रीफळ वाढविणे आणि मंत्रोच्चारांच्या साक्षीने भूमिपूजन करण्यात आले. या मंगल सोहळ्याला ग्रामस्थांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मंदिर विकासाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील, गटनेते दिलीप पाटील, अ. लाटचे ग्रामपंचायत सदस्य सतीश कोळी, युवा नेते नितीन बागे, युनुस जमादार, सरपंच सौ. रेखा जाधव, उपसरपंच प्रमोद माळगे, माजी सरपंच सौ. चंद्रकला पाटील, शोभा पाटील, वैशाली पाटील, सारंग पाटील, शांतिनाथ चौगुले, रतन चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, दयानंद पाटील, भरत पोवार, हयातचाँद जमादार, अफसर मकानदार, सौ. विजयमाला पाटील, सौ. शीतल कांबळे, अशोक पाटील, शंकर पाटील, सुधीर माळी, रामगोंडा पाटील, गिरीश पाटील यांच्यासह श्री हालसिद्धनाथ मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिर परिसराची सुरक्षितता आणि परिसराचे सुशोभीकरण लक्षात घेता संरक्षक भिंतीची आवश्यकता अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. मंजूर झालेल्या निधीमुळे हे महत्त्वाचे काम आता प्रत्यक्षात सुरू होत असून त्यामुळे मंदिर परिसर अधिक सुरक्षित आणि आकर्षक होणार आहे.
उपस्थित मान्यवरांनी धार्मिक स्थळांच्या जतनासोबतच गावाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी अशा विकासकामांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. तसेच निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले. हे काम उच्च दर्जाचे, पारदर्शक आणि निश्चित मुदतीत पूर्ण होऊन भाविकांना अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

error: Content is protected !!