आरोग्य आणि सदाचारातून व्यसनमुक्तीकडे वळणे काळाची गरज; नाना पाटील

Spread the love

स्मँक येथे कै. सुनील जनवाडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

आजच्या धावपळीच्या युगात शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या सवयींची गरज आहे. सदाचार आणि आरोग्याची जाणीव ठेवली तर तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहू शकते.” , असे प्रतिपादन नाना पाटील यांनी केले ते स्मँक येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक) संचलित श्रीमती सोनाबाई शं. जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र व स्व. जवनमलजी गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य, सदाचार आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन होते.कै. सुनील जनवाडकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित न करण्यात आलेल्या व्याख्यानात. पुढे बोलताना नाना पाटील म्हणाले की, ” आजची पिढी ही व्यसन वेग वेगळ्या कारणांनी करते पण करणं जरी काही असलीत तरी त्याचा दुष्परिणाम हा ठरलेला असतो. कोणत्याही जनावरांच्या समोर तंबाखू आणि अल्कोहोल असलेल्या वस्तू ठेवल्या तरी त्याला जनावर सुद्धा तोंड लावत नाही. मग प्रश्न पडतो की जनावरांना कळते ते माणसाला कळत नाही कसे.?? . शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या सवयींची गरज आहे. सदाचार आणि आरोग्याची जाणीव ठेवली तर तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहू शकते.”अध्यक्षपदावरून बोलताना सुरेंद्र जैन म्हणाले की, सुनील जनवाडकर यांनी व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत सर्व सामान्य जनतेसाठी आपल्या व्यवसायातून वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले तोच धागा पकडून त्यांचे कार्य त्यांच्या पश्चात जनवाडकर ग्रुप करत आहे.या कार्यक्रमासाठी ‘स्मॅक’चे अध्यक्ष जयदीप चौगले, उपाध्यक्ष भरत जाधव, आणि स्मॅक आयटीआयचे चेअरमन प्रशांत शेळके , बदाम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तर व्हर्सटाईलचे मनोहर पाटील, हेमंत वरुटे , गोपाल जाधव , प्रकाश पाटील, आणि सचिन घुनके हे उपस्थित होते .सिद्धार्थ क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आणि ‘स्मॅक’ संस्थेचे सदस्य तसेच स्मँक आयटीआयचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

error: Content is protected !!