पुलाची शिरोली येथे शुक्रवारी हिंदू जनआक्रोश सभेचे आयोजन

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली परिसरातील काही तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून बदनामी करण्यात आल्याच्या कथित प्रकाराच्या निषेधार्थ पुलाची शिरोली येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हिंदू जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नवभारत क्रीडा मंडळाच्या पटांगणावर ही सभा होणार असून, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.या सभेमध्ये विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप तसेच सागर बेग हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सभेतून करण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावरही चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, प्रेमसंबंधांचे आमिष दाखवून काही महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांची बदनामी केल्याचा आरोप शाहिद सनदे व शाहरुख देसाई यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात संतापाची भावना निर्माण झाली असून विविध संघटना आणि नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारनेही याची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तपास यंत्रणा या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन संबंधित सर्व बाबींची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.हिंदू जनआक्रोश सभेच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचार, सोशल मीडियाचा गैरवापर आणि समाजातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात आवाज उठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

error: Content is protected !!