सिद्धिविनायक मंदिर परिसरात दुर्गा सहेलीचा स्तुत्य उपक्रम; महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

मौजे आगर येथील जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेली या सामाजिक संस्थेमार्फत सिद्धिविनायक मंदिर परिसरात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या शिबिरामध्ये मॅमोग्राफीद्वारे स्तनाच्या कॅन्सरची तपासणी तसेच जनरल हेल्थ चेकअप, बीपी आणि शुगर तपासणी आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.या शिबिराचे उद्घाटन उद्योजिका सौ. रेखा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. शिबिरादरम्यान एकूण ३८ महिलांची जनरल तपासणी करण्यात आली, तर ३१ महिलांनी मॅमोग्राफी तपासणीचा लाभ घेतला. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या शिबिरासाठी उषःकाल हॉस्पिटलचे विशेष सहकार्य लाभले. सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्याने अनेक महिलांना आरोग्य तपासणीची संधी मिळाली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रुपच्या संस्थापिका व फेडरेशन उपाध्यक्ष डॉ. सौ. स्नेहल कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.तसेच शिबिर यशस्वी होण्यासाठी सौ. कुसुम जगदाळे, अॅड. शर्मिला देशपांडे, सौ. अनुराधा वेल्हाळ, सौ. नलिनी देसाई, सौ. प्रतिभा ढापरे आणि सौ. रेखा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय फेडरेशन स्पेशल ऑफिसर श्री सुधीर (भैय्या) कुलकर्णी, सिद्धिविनायक गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन श्री अनिल इनामदार तसेच गोल्ड सिटीचे श्री पांडुरंग बंडगर यांचे सहकार्यही लाभले.कार्यक्रमास फेडरेशन डायरेक्टर अॅड. भाग्यश्री जोशी, श्री शंकर देसाई आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. दुर्गा सहेली संस्थेने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व समाजोपयोगी असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.

Leave a Comment

error: Content is protected !!