जठारवाडी येथील दरा परिसरात बिबट्याने वानरांच्या कळपावर हल्ला केला पण वानर मादीला कवटाळून बसलेल्या पिल्लापाहूण बिबट्या थबकला अन शिकार टाकून डोंगराच्या दिशेने पलायन
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
जठारवाडी ( ता. करवीर ) मसोबाचा दरा परिसरात अन्नाच्या शोधात असलेल्या एका बिबट्याने वानरांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याने एका वानर मादीची शिकार केली. वानर मादी जमीनीवर पडताच तिचे पिल्लू मृत मादीला बिलगून ( आईला कवटाळून ) बसलेले पाहून बिबट्या त्या अनाथ पिल्लाला पाहून थबकला अन शिकार तिथेच टाकून डोंगराच्या दिशेने पलायन केले वनविभागाचे ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा शोध घेतला पण सापडला नाही .जठारवाडी ता करवीर येथील मसोबाचा दरा परिसरात आज सकाळी भुकेल्या बिबट्याने वानराच्या कळपावर हल्ला करून मादीची शिकार केली, पण तिच्या सोबत असलेल्या पिल्लाला पाहून बिबट्यातील ‘आई’ जागी झाली असावी म्हणून त्याने आपली शिकार सोडून पिल्लाला जीवदान दिले ही हृदयस्पर्शी घटना घडली असल्याने जठारवाडीसह परिसरात मृत आईला कवटाळून बसलेल्या पिल्लाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यामातून व्हायरल होत आहे . सध्या डोंगर भागात बिबट्याला आपली शिकार मिळत नसल्याने तो अन्नाच्या शोधात लोकवस्तीकडे वळत असल्याचे दिसत आहे आज गावातील काही लोक दरा भागात शेतीतील कामे करण्यासाठी गेले असता त्यानी ५ ते १० फुटावर हा बिबट्याला पाहिले त्याच वेळी घटना घडली पण बिबट्याने काही क्षणांपूर्वी आईचा जीव घेतला होता, तोच बिबट्या त्या अनाथ पिल्लाला पाहून थबकला अन तेथून तो जंगलात पळून गेला .या घटनेची माहिती वनविभागाला देताच त्यानी घटनास्थळी धाव घेवून घटनेची पहाणी केली यावेळी वानराच्या पिल्लाला ताब्यात घेवून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने पालनपोषण आणि संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे. पिल्लू पूर्णपणे स्वावलंबी होईपर्यंत त्याची विशेष काळजी घेतली जाईल. व त्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येईल असे वन रेस्कू टीम प्रमुख वनविभाग कोल्हापूर प्रदीप सुतार यानी सांगितले .