आगर व उदगावात भाजपचे संदीप पुजारी प्रचारात आघाडीवर,वैयक्तिक संपर्कामुळे वातावरण सकारात्मक

Spread the love

आगर / प्रतिनिधी

उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार संदीप पुजारी यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या आगर व उदगाव परिसरात दिसून येत आहे.आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदीप पुजारी यांनी जनसंपर्क मोहिमेला वेग दिला असून,त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी संदीप पुजारी तर उदगाव पंचायत समिती गणातून सौ. सुनीता आदिनाथ चौगुले या निवडणूक रिंगणात आहेत.दोन्ही उमेदवारांच्या संयुक्त प्रचारामुळे आगर व उदगाव परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.घराघरात भेटी देत, मतदारांशी थेट संवाद साधण्यावर उमेदवारांचा भर असून, ‘कमळ’ हे चिन्ह सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात प्रचार यंत्रणा यशस्वी ठरत आहे.संदीप पुजारी यांनी यापूर्वी केलेल्या सामाजिक व विकासात्मक कामांची चर्चा मतदारांमध्ये होताना दिसत आहे.रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण व ग्रामीण विकास यासंदर्भातील मुद्दे प्रचारादरम्यान ठळकपणे मांडले जात आहेत.तर पंचायत समिती उमेदवार सौ.सुनीता चौगुले यांनी महिलांसाठीच्या योजना, स्वयंरोजगार,बचत गट आणि ग्रामविकासावर विशेष भर देत प्रचार केला आहे.आगर व उदगाव या दोन्ही गावांमध्ये भाजप,रिपाई आठवले गट व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे. प्रचार फेऱ्या, बैठका,कॉर्नर सभा तसेच वैयक्तिक संपर्क मोहिमांमुळे वातावरण सकारात्मक होत आहे.अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून संदीप पुजारी आणि पंचायत समिती गणातून सौ.सुनीता आदिनाथ चौगुले हे दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मतदारसंघातील नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता असून, या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!