शिरोली एमआयडीसीमध्ये कंपनीतून सव्वाचार लाखांचे स्क्रॅप साहित्य लंपास; तिघांवर गुन्हा दाखल

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीत दोघा सुरक्षारक्षक व एका सफाई कामगाराने संगनमत करून सव्वाचार लाखाच्या पितळी पाईप आणि लोखंडी स्क्रॅपची चोरी केल्याने त्यांच्यावर शिरोली पोलिस गुन्हा केला आहे .याबाबत अधिक माहिती अशी कि शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीत सतीश नामदेव खाडे ( रा. सांंगरुळ ता. करवीर) व युवराज गणपती नाईक (रा. आसगाव ता. पन्हाळा) हे दोघे सुरक्षारक्षक तर प्रशांत बाळासाहेब टिपगुडे ( रा. कदमवाडी कोल्हापूर ) या सफाई कामगार या तिघांनी संगनमत करून २६ जानेवारी २०२६ व २ फेब्रुवारी २०२६ या काळात त्यानी कंपनीतून पितळी पाईप: ३,७२,००० रुपये किमतीचे ४३ नग वजन सुमारे ३७२ किलो व लोखंडी स्क्रॅप टर्निंग स्क्रॅप ५१,९६० रुपये किमतीचा २१६५ किलो लोखंडी स्क्रप असे साहित्य २६ जानेवारी व २ फेब्रुवारी या सोमवारच्या दिवशी तिघानी कंपनीच्या आवारातून या स्क्रॅप साहित्याची चोरी केली . असून याबाबतची फिर्याद कंपनीचे एचआर मॅनेजर रवींद्र पंडित कारंडे यानी शिरोली एमआयडीसी पोलिसात दिली आहे.या फिर्यादीवरून या तिन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Leave a Comment

error: Content is protected !!