शिये परिसरात गांजा पकडला, गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई, १ लाखाचा मुद्देमालासह तरुणास अटक

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिये (ता. करवीर) येथील हनुमान नगर परिसरात गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला रंगेहाथ पकडत त्याच्याकडून एक लाखाचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला हि कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली .अधिक माहिती अशी कि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथके तैनात केली होती त्यानुसार स. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी व महेश आंबी यांना शिये हनुमान नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आरोपी अकबर बादशाह अत्तार ( वय २५ मुळगाव कदमवाडी कोल्हापूर सध्या रा. माळवाडी पुलाची शिरोली ता. हातकणंगले ) याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता १ किलो १६० ग्रॅम. गांजा , एक स्प्लेंडर प्लस मोटारसायकल व मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली . या गुन्ह्याची नोंद शिरोली पोलिसात करण्यात आली आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!