देशसेवेची शपथ घेऊन तरुणांनी देशासाठी योगदान द्यावे – मा उल्हासदादा पाटील 

Spread the love

सैनिक टाकळी / प्रतिनिधी 

सैनिक टाकळी गावातील अवधूत पाटील याला भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल माजी आमदार उल्हासदादा पाटील आणि गावातील इतर सहकारी यांनी त्याच्या निवासस्थानी भेट देऊन सत्कार केला.अवधूतच्या या यशाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.सैनिक टाकळी हे गाव सैनिकी परंपरेसाठी ओळखले जाते.गेल्या अनेक वर्षांपासून या गावातून शेकडो तरुण सैन्यात भरती होऊन देशससेवा बजावत आहेत.त्यांचा आदर्श समोर ठेवून अवधूत पाटील या तरुणाने इंडियन आर्मीमध्ये निवड होऊन गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.सत्कार कार्यक्रमात माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी शुभेच्छा देताना म्हणाले, अवधूतच्या यशाने सैनिक टाकळी गावासह संपूर्ण शिरोळ तालुक्याचे नाव गौरवमय झाले आहे.आजी माजी सैनिकांचा आदर्श समोर ठेवून या गावातील इतर तरुणांनी देखील देशसेवेची शपथ घेऊन भविष्यात देशासाठी योगदान द्यावे.सैनिक टाकळी गावात यापूर्वीही अनेक तरुण सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करत आहेत. यावेळी गावातील नागरिक,युवा,शिक्षक आणि अवधूतला शुभेच्छा दिल्या. भविष्यात तरुणांमध्ये देशसेवेच्या क्षेत्रात प्रेरणा वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सैनिक टाकळीसारख्या गावातून सतत देशसेवेची प्रेरणा निर्माण होत असल्याने,येणाऱ्या काळात या गावाचे नाव अजून मोठ्या स्तरावर प्रसिद्ध होईल, असा विश्वास गावकरी आणि पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!