दुचाकी घसरून पडल्याने नागाव येथील एकाचा मृत्यू 

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

मुलांना शाळेत सोडून घरी येत असताना दुचाकी खड्ड्यात गेल्याने दुर्दैवाने एकजण जागीच ठार झाला.दिलीप दत्ता पोवार (वय ४७ रा.नागाव फाटा ता. हातकणंगले ) असे त्यांचे नाव असून हि घटना नागाव फाटा येथील बँक ऑफ बडोदा शेजारी सोमवारी सकाळी दहा वाजता घडली. या बाबतची अधिक माहीती अशी कि दिलीप दत्तात्रय पोवार हा सोमवारी सकाळी दहा वाजण्यासुमारास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील आदर्श विद्यालय येथे शाळेत मुलांना दुचाकीवरून सोडून घरी येत असताना सेवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत त्याची गाडी गेल्याने तो रस्त्यावर पडला होता . त्याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.दिलीपचा नागाव फाटा येथेच या पुर्वी अपघात झाला होता त्यात तो बचावला पण दुसऱ्यांदा झालेल्या या अपघातात मात्र त्याला आपला जीव गमवावा लागला . नऊ वर्षापूर्वी नागाव फाटा येथील चौकात रस्ता ओलांडताना भरधाव टेम्पोने त्याच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता रूग्णालयातील योग्य उपचारामुळे ८ दिवसांनी बरा होऊन घरी परतला होता. टेम्पोच्या धडकेतून तो सुखरूप बचावला पण आज मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने त्याचा जीव घेतला. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.योग्य खबरदारी न घेता अनेक ठिकाणी पर्यायी रस्ता वळविण्यात आला आहे.अशा या रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.अशा महामार्गावरील वाहतूकीच्या गलथान कारभारामुळे दिलीपला येथील खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!