पैजारवाडी येथील वळणावर ट्रक पलटी होवून चालक जागीच ठार

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावर पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी येथील वळणावर रात्री साडे अकराच्या दरम्यान लाकुड वाहतूक करणारा ट्रक पलटी होवून त्याखाली चालक संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील विजय दिगंबर शिंदे हा ४६ वर्षीय हा चालक सापडून जागीच ठार झालाय याबाबतची नोंद कोडोली पोलीसात झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथून चालक विजय शिंदे कोल्हापूर कडे ट्रक एम एच 17 BY 1 887 मध्ये लाकडे भरून जात असताना कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी येथील वळणावर आला असता चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेला ट्रक पलटी झाला. चालक विजय याने उडी टाकण्याचा प्रयत्न केला असता ट्रक खाली सापडलेने डोक्याला आणि पायाला गंभीर जखम होवून तो जागीच ठार झाला. हा अपघात येवढा भिषण होता की त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते . याअपघाताची माहीती समजताच महामार्ग पोलीस घट्नास्थळी दाखल झाले ,वाहतूक सुरळीत करून अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठवण्यात आला अधिक तपास कोडोली पोलीस करीत आहेत .लाकडाची वाहतूक करणारे ट्रक रात्रीचीच वाहतूक कां करतात? बोरपाडळे हॉटेल इथल्या वन विभागाच्या चेक नाक्यावर वाहणांची तपासणी होते पण इथले अधिकारी या ट्रक मध्ये नेमक काय तपासतात की अर्थपूर्ण घडामोडी होऊन ट्रक सोडले जातात असा प्रशन सर्व सामान्य नागरीक उपस्थित करत आहेत, ओव्हर लोड वाहतूकीमूळ या ट्रक चालकाचा जीव गेला असल्याचे इथल्या स्थानीकांचं म्हणण आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!