गायरान बचाव समितीच्या वतीने मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा
पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे
मौजे वडगाव ता. हातकणंगले येथील गट नंबर ५१२ मधील अकरा हेक्टर जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सोलर कंपनीला देण्यात आल्याने गावामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.या विरोधात मौजे वडगाव गायरान बचाव समितीच्या वतीने गाव सभा पार पडली या सभेत कोणत्याही परिस्थितीत गावची जागा दिली जाणार नाही यासाठी मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. गावातील गायरान कोणत्याही प्रोजेक्टसाठी देवू नये साठी २०२२ गावसभेत ठराव करून देखील ग्रामपंचायत सत्ताधार्यांनी हमकरोसा कायदा वापरून चुकीच्या ठरावानुसार सौरऊर्जा कंपनीला दिल्याचा आरोप गायरान बचाव समितीकडून केला आहे.गायरान जमीन गट नंबर 512, गट नंबर 451, गट नंबर 476 गट नंबर 420 या सर्व गटातील जवळपास १७५ एकर गायरान जमीन आहे. यातील गट नंबर 512 मध्ये पाझर तलाव आहे. या तलाव परिसरात शेती आणि डोंगर असून या परिसरात पडणारा पाऊस या पाझर तलावात साठवला जातो. आणि त्यातील पाणी वर्षभर गावासाठी पिण्यासाठी वापरले जाते. याच गटातील काही जमीन यापूर्वी केंद्र सरकारच्या गॅस योजनेसाठी दोन कंपन्यांना देण्यात आली आहे. पाझर तलाव असलेल्या याच गटातील अकरा हेक्टर जमीन तीस वर्षे कालावधीसाठी वार्षिक एक रुपये नाममात्र भाड्यापट्ट्याने देण्याचा आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी 2 जानेवारी 2025 रोजी दिला आहे. मौजे वडगाव ग्रामपंचायत ने 13 जानेवारी 2025 रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. यामध्ये गट नंबर 512 मधील जमिन देण्यास विरोध करून गायरान गट क्रमांक 451, आणि 476 मधील जमीन देण्याबाबत चर्चा झाली. या योजनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेती पंपांना दिवसा वीज मिळावी यासाठी जागा देण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी 126 ग्रामस्थ उपस्थित होते त्यामध्ये काही ग्रामस्थांनी पूर्ण विरोध दर्शवला होता. त्यानंतर काही महिन्यांनी ही जागा सौर ऊर्जा कंपनीला देण्यात आली. त्या ठिकाणी आता सौर ऊर्जेचे सोलर उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ही माहिती गावात पसरताच गावामध्ये असंतोष पसरला. भविष्यामध्ये पाझर तलावातील पाणी दूषित होऊन गावाला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागेल, हे क्षेत्र कॅचमेट एरिया असल्याने इथं निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे त्याच्यावर ही परिणाम होऊन शेती, जनावरे, यांच्यावरही मोठा परिणाम होणार असून त्या परिसरातील 400 ते 500 एकर शेती अडचणीत येणार आहे त्यामुळे या प्रकल्पाला पूर्ण विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी मौजे वडगाव गायरान बचाव समिती स्थापन करून सभा घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.मौजे वडगाव गावची गायरान जमिन जवळपास १७५ एकराच्या आसपास असून येथे गावच्या हितासाठी अनेक शासकीय प्रोजेक्ट आले होते पण गावच्या हितासाठी गावकऱ्यांनी एकजूट होऊन अनेक प्रोजेक्ट येथील जमीन होऊ दिले नाहीत कारण संपूर्ण गाव शेतीवर अवलंबून आहे गायरान जमीन नवनवीन प्रोजेक्टसाठी दिले तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहेत.यावेळी महेश कांबरे. उमाजी जाधव. माजी सरपंच काशिनाथ कांबळे. हमजेखान.हजारी. पवन जाधव. संतोष लोंढे. रमेश लोंढे. शशिकांत तराळ. राजकुमार थोरवत. महादेव चौगुले. बशीर हजारे. रघुनाथ काकडे. नितीन घोरपडे सचिन चौगुले. वृषभ नाथ पाटील. उदय चौगुले. सचिन थोरवत. अनंत जाधव. सयाजी कांबळे. इत्यादी उपस्थित होते गावातील शेतकरी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवर उपस्थित होते