हालोंडी येथे ३० एकर ऊसाच्या फडाला शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखोचे नुकसान 

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

हालोंडी ता हातकणंगले येथील ३० एकर ऊसाच्या फडाला शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात ऊस जळाल्याने शेतकर्याचे लाखोचे नुकसान झाले , या आगीचा जणांवरांना धोका निर्माण झाल्याने शेतकर्यानी जणावरे सुरक्षित स्थळी हलवण्यात आली शर्तीच्या प्रयत्न नंतर आग आटोक्यात आली. हालोंडी गावाशेजारी नदीकडील भागात घुमाई बंधू व किरण पाटील यांची जवळपास ३० एकर आडसाल ऊसाची लावण असून या ऊसाच्या फडामधून उच्च दाबाची विद्युत तार गेली असून आज मंगळवारी दुपारी ३:३० वाजण्यासुमार वाऱ्यामुळे या तारा एकमेकांना स्पर्श होऊन शाॅर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली . या आगीने रौद्ररूप धारण केल्याने बघता बघता जवळपास ३० एकर ऊसाचा फड जळून खाक झाला . ही आग लागल्याचे समजताच गावातील नागरिक व स्थानिक शेतकरी बाबासो घुमाई , गुंडा पुनगोंडा पाटील , सरपंच अतुल कोळी , वर्धमान बेळंकी , उत्तम कांबळे , सुनील कांबळे, महावीर कांबळे ,रुपेश सागर अजित घुमाई , श्रीधर घुमाई सुकुमार घुमाई , सचिन घुमाई , बच्चन धनवडे , कार्तिक डोणे यानी धाव घेवून आगीवर पाण्याचा व ऊसाच्या वाढ्याचा मारा करून आग आटोक्यात आणली पण शेजारीच घुमाई बंधुंचे जणांवरांचे तिन गोठे असल्याने या आगीची झळ जणांवरांना लागणार असे निदर्शनास येताच गोठ्यातून जणांवरे बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आली .या लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे हा जळालेला ऊस शेतात पडत राहून अदिक नुकसान होण्या आदी साखर कारखान्याणी या शेतकऱ्यांचा जळालेला ऊस त्वरीत घेवून जावे अशी शेतकरी मागणी करत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!