राजेंद्र हायस्कूल अंबप या शाळेच्या दहावी बॅचचे मिनी गेट-टुगेदर उत्साहात

Spread the love

 

 पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे 

सादळे मादळे रोड येथील नक्षत्र हॉटेल या ठिकाणी या मिनी गेट-टुगेदर व टी-शर्ट वितरण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आपल्या दहावीच्या बॅचच्या एकूण 50 विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग दाखवला होता. यामध्ये पुण्याहून डॉ.विष्णू माने, धनंजय पाटील, सावळज सुभाष मोहिते, कराड अमोल अंबपकर, कुरळप अमर शेटे, शिरोली विजय हजारे, वारणा मानसिंग सूर्यवंशी, तसेच अंबप, अंबपवाडी, मनपाडळे या ठिकाणी हून सर्व बालमित्र उपस्थित राहिले होते.कार्यक्रमाची प्रस्तावना आमचे बालमित्र शशिकांत माळी यांनी सुरुवात केली आपण सर्व मित्र श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी आपली भेट झालेली आहे . सर्वांनी आपली पद व मान मर्यादा विसरून सर्वांनी आपण बालमित्र आहे. एकाच बेंचवर बसलो आहे. आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. आणि सर्वांनी आपले बालमित्र यांना जुना आठवणींना उजाळा द्यावा असे सांगून त्यांनी प्रास्ताविक थांबवली.या कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. विष्णू माने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

आमचे बालमित्र धनंजय निलजे शिवाजी खोत मंगेश वाघमोडे तानाजी सूर्यवंशी यांनी बालपणीच्या आठवणी सांगून यांनी सर्वांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.आपल्या बाल मित्रांनी जुन्या आठवणी थोडक्यात सांगितल्या त्यामध्ये राहुल पाटील दत्तात्रय दिंडे सर अजित पाटील सर जयसिंग वठारे मानसिंग सूर्यवंशी सुनील जाधव उदय माळी सुभाष मोहिते धनाजी पाटील या लोकांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी आवर्जून सांगितल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख डॉ.विष्णू माने यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन सर्व बालमित्रांना केले.यामध्ये आपले आरोग्य आपला व्यवसाय व आपली कुटुंबाची जबाबदारी या प्रमुख जबाबदारीची माहिती सर्व बालमित्रांना समजावून सांगितली. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक बबन माळी , मंगेश वाघमोडे, शशिकांत धनाजी , निलजे शिवाजी खोत , तानाजी सूर्यवंशी व सुनील जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व बालमित्र मित्रांच्या वतीने त्यांचं सत्कार करण्यात आला.आभार, बबन माळी यांनी माणले आपण सर्वजण या टी-शर्ट वितरण व मिनी गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी आपण सर्व बालमित्र एकत्र येऊन कार्यक्रम घेतल्याबद्दल आपल्या सर्व बालमित्रांचे मी आभार मानतो इथून पुढे असाच कार्यक्रम होवो अशी अशा करतो आणि मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. तसेच सर्वांनी जेवण करावे असे सांगून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.शेवटच्या कार्यक्रमांमध्ये ग्रुप फोटो व सत्कार फोटो सर्वांचे काढण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!