संभापूर येथे किरकोळ कारणावरून परप्रांतीय तरूणाचा चाकूने भोसकून खून

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

 

किरकोळ कारणावरून परप्रांतीय तरूणाचा चाकूने भोसकून खून हा खून नशेतून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे . ही घटना सोमवारी रात्री १० वाजण्यासुमार घडली . या हल्ल्यात मंगल मांझी हा मयत झाला , आरोपीस पोलिसानी अटक करून ताब्यात घेतले . संभापूर ता हातकणंगले येथील बिरदेव मंदिराच्या मागील बाजूस भाड्याच्या घरात राहणाऱ्या दोन परप्रांतीय कामगारांच्यात किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी झाली या मारहाणीत आरोपी देवा चंदन याने रागाच्या भरात मंगल मांझी वय २६ याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला भोसकले त्या तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला . या घटनेने परिसर हादरून गेला . हे दोघे संभापूर येथील एका खाजगी कंपनीत काम करत होते सोमवारी सुट्टी असल्याने ते दुपारपासून गांजा व दारूच्या नशेत होते त्यात या दोघांचा किरकोळ कारणावरून वाद झाल्याने देवा चंदन याने मंगलवर चाकूने हल्ला करून त्याला भोकसले असे घटनास्थळावरून बोलले जात होते .या ही घटना शेजारी राहणाऱ्या अन्य लोकानी पाहीली व त्यानी मांझी यास उपचारासाठी हलवले व शिरोली पोलिसाना याबाबत कल्पना दिली घटनास्थळी पोलिस दाखल होऊन घटनेची पहाणी करत आरोपीस ताब्यात घेतले .

Leave a Comment

error: Content is protected !!