शेतकऱ्यांच्या हितासाठी छातीची ढाल बनून लढा देणाऱ्या शेतकरी सुपुत्राला साथ द्या 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १० मध्ये यंदा चौरंगी लढत रंगतदार बनली आहे.दत्त,गुरुदत्त आणि शरद या तीन साखर कारखान्यांशी संबंधित उमेदवारांसोबतच आंदोलन अंकुश संघटनेचा शेतकरी सुपुत्र कृष्णा देशमुख हे ही जोरदार मतदारसंघात आपले अस्तित्व दाखवत आहेत.ऊस दराचा प्रश्न हा या प्रभागातील निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. कृष्णा देशमुख यांनी गेल्या काही वर्षांत ऊस दरवाढीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले असून काही प्रसंगी पोलिसांच्या लाट्या- काट्या खाल्ले आहेत.शेतकऱ्यांच्या हितासाठी छातीची ढाल बनून रक्ताचे पाणी करत लढा दिल्याचा घटना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत.आंदोलन अंकुश संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ऊस दरवाढीसाठी केलेली चळवळ हे त्यांचे मुख्य निवडणूक वलय असल्याचे मानले जाते.त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस भूमिका घेणारी नेतृत्वशक्ती महत्त्वाची असून आंदोलनातून पुढे आलेल्या नेतृत्वाला साथ मिळाली तर ऊस दरवाढीच्या चळवळीला बळ मिळेल.अनेक शेतकऱ्यांनीही देशमुख यांच्या लढाऊ भूमिकेचा उल्लेख करत निवडणुकीत ऊस दराचा मुद्दा निर्णायक ठरू शकतो,असे मत व्यक्त केले.दुसऱ्या बाजूला,कारखान्यांचे उमेदवारही आपापल्या विकासकामांच्या आणि स्थानिक पातळीवरील संपर्काच्या आधारावर मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.कारखान्यांशी निगडित उमेदवारांना पारंपरिक मतपेढीचा लाभ मिळू शकतो,असे स्थानिक राजकीय जाणकारांचे मत आहे.ऊस दराबरोबरच मूलभूत सुविधा,रस्ते,पाणीपुरवठा,तसेच नागरी विकासाच्या मुद्यांवरही सर्व उमेदवार मतदारांशी संवाद साधत आहेत.प्रभाग क्रमांक १० मध्ये शेतकरी मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने अंतिम क्षणापर्यंत ऊस दराचा मुद्दा चर्चेत राहणार हे निश्चित.चौघांच्या लढतीमुळे मतविभाजनाची शक्यता निर्माण झाली असल्याने अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!