शिरोळ तालुका विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ सभेत आरोप–प्रत्यारोपाने खळबळ 

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी 

शिरोळ तालुका विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ सभेत आमदार अशोकराव माने यांच्या सून व माजी नगराध्यक्षा डॉ.नीता माने यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले आहे.जयसिंगपूर राजीव गांधी नगर ७ वी गल्ली येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेची जागा एका माजी नगरसेवकांनी विकल्याचा आरोप सभेत करताना,त्या पैशातून हॉटेल उभारले असल्याचा दावा त्यांनी केला.अशा व्यक्तींना पुन्हा सभागृहात पाठवू नये,अशी मागणीही त्यांनी उपस्थितांसमोर केली.

Leave a Comment

error: Content is protected !!