‘तेग भल्ला नगराध्यक्ष आपला’ व्हायरल पोस्टने डॉ अशोकराव माने कुटुंबाला सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूती

Spread the love

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात चांगलाच ऊत आला आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शिरोळ, कुरुंदवाड आणि जयसिंगपूर नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात शिरोळ दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अचानक भेट घेऊन महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी,माजी आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील आणि पृथ्वीराज यादव हे एकत्र येऊन आगामी निवडणुका एकत्र लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली.या घोषणेनंतर शिरोळ शहरात ‘तेग भल्ला नगराध्यक्ष आपला’ अशी एक पोस्ट व्हायरल झाली असून, त्यामुळे राजकीय चर्चेला अधिक ऊत आला आहे.या घडामोडींनंतर आमदार डॉ.अशोकराव माने, डॉ.अरविंद माने आणि सौ.सारिका माने यांच्याबद्दल जनतेमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.माने कुटुंबाने आतापर्यंत कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांना केंद्रस्थानी ठेवून सर्व समाजघटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे.दरम्यान, शिरोळ नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला आरक्षित जाहीर झाल्याने माने कुटुंबाच्या वतीने सौ.सारिका माने निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.सासरे आमदार डॉ.अशोकराव माने आणि पती माजी नगरसेवक डॉ.अरविंद माने यांच्या राजकीय अनुभवाचा लाभ घेत,शहराचा विकास हा मुख्य ध्येय ठेवून त्या निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.आमदार अशोकराव माने व डॉ अरविंद माने कुटुंबाच्या कार्यकाळात शहरात केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत.स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व सामाजिक उपक्रम या सर्वच क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये माने कुटुंबाविषयी विश्वास निर्माण झाला आहे.त्यामुळे जातीपातीचे राजकारण न करता विकासाच्या मुद्यावर नागरिकांचा कल सौ.सारिका माने यांच्या उमेदवारीकडे वाढताना दिसत आहे.
शिरोळच्या राजकारणात आता नव्या समीकरणांना आणि विकासाभिमुख राजकारणाला चालना मिळणार असल्याचे संकेत या घडामोडींमधून स्पष्ट झाले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!