पदयात्रेत सहभागी झालेल्या लोकांना पिण्याचे पाणी , लिंबू सरबत , नाष्टा, जेवणाची सोय
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
महादेवी उर्फ माधुरी ही हत्तीणीस’ परत मिळावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मागणीचे निवेदन देण्यासाठी नांदणी येथून सुरु झालेल्या पदयात्रेला जिल्ह्यातील सर्वधर्मीयानी पहाटे पाच वाजल्यापासून रस्त्यावर उतरत सहभाग नोंदविला.ही पदयात्रा शांततेत पार पडली मात्र या पदयात्रेमुळे कोल्हापूर -सांगली व पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीची कोंडी झाली होती , पदयात्रे दरम्यान ठिकठिकाणी पदयात्रेत सहभागी झालेल्या लोकांना पिण्याचे पाणी , लिंबू सरबत , नाष्टा, जेवणाची सोय गावात गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून नांदणी येथून निघालेली पदयात्रा शिरोळ , हातकणंगले , तालुक्यातील अनेक गावातून जात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पोचली पदयात्रा शांततेत पार पडावी यासाठी पदयात्रेत सहभागी जनतेनेच माजी खासदार शेट्टी यांच्या आदेशाचे पालन केले त्यासाठी पोलिसांनी नियोजनबद्ध व नेटका बंदोबस्त ठेवला होता .कोल्हापूर सांगली व तावडे हॉटेल ते वाठार पर्यंत वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती. यामुळे अनेक प्रवाशांना ताटकळत बसावे लागते होते .या प्रवाशांना आंदोलनाचे कारण कळताच अनेक जणांनी प्रवास ताटकळत करावा लागला तरी चालेल आमची महादेवी हत्तीण परत आली पाहीजे असा सुर प्रवाशी वर्गातून उमटत होता .आज पावसाने दिवसभरात उघडीप दिली असली तरी उन्हाणाची तीवरता कमी असली तरी गरमी होत होती पदयात्रेत सहभाग होणाऱ्या जनतेचे गरमीमुळे हाल होऊ नये यासाठी चोकाक येथील विशाल मंडप येथे नाष्टा , जेवण तर हेरले , हालोंडी , सांगली फाटा येथील जैन मंदिरासमोर पिण्याच्या पाणी बाॅटल, लिंबू सरबतची सोय करण्यात आली होती .