सौ.मालनताई पाटील यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी : ॲड.श्रीकांत माळकर

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

 

सौ.मालनताई पाटील यांनी तब्बल ३७ वर्षे एक अंगणवाडी सेविका म्हणून रोज आठ तास पायी प्रवास करून हजारो मुलांना घडविण्याचे जे मोलाचे कार्य केले आहे. ते सर्वांसाठी प्रेरणादायी असून नव्या पिढीने त्यांच्याकडून कष्ट ,मेहनत व परिश्रमाचा वारसा घेतला पाहिजे.असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते ॲड. प्रा. श्रीकांत माळकर यांनी केले.

 

मौजे आगर येथील अंगणवाडी सेविका सौ. मालनताई हैबतराव पाटील यांच्या सेवानिवृत्ती समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सदिच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौजे आगरचे माजी सरपंच अमोल चव्हाण होते. शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा नेते पृथ्वीराज यादव , गट शिक्षण अधिकारी भारती कोळी, अंगणवाडी विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. पोहाळे मॅडम, राधा महिला सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. जयश्री पाटील, मौजे आगरचे माजी सरपंच बजरंग सुतार, दिलीप चव्हाण, अरविंद मोरे, तुकाराम पाटील, अर्जुनवाडचे माजी सरपंच विकास पाटील शिरोळचे माजी नगरसेवक पै प्रकाश गावडे, प्रा. आण्णासाहेब गावडे एन.वाय. जाधव, गजानन चव्हाण, सुनील पाटील, कर्नाळ ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील,यांच्यासह शिरोळ मौजे आगर अर्जुनवाड परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना ॲड प्रा श्रीकांत माळकर पुढे म्हणाले ,” सौ. मालनताई पाटील यांनी तीन तपांहून अधिक काळ ज्ञानदानाचे पवित्र कार्य अतिशय निःस्वार्थी व सेवाभावी वृत्तीने केले असून त्यांच्या हाताखाली शिकलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदांवर काम करीत आहेत.”

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सौ. मालनताई पाटील यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक चंद्रकांत भाट यांनी केले. गटशिक्षणाधिकारी सौ भारती कोळी, परिवेक्षिका पोहाळे, सौ जयश्री पाटील, पृथ्वीराज यादव, अमोल चव्हाण, प्रांजल पाटील, अमित पाटील,अशा अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौ मालन पाटील यांनी या सत्कार सोहळ्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

प्रा. के. एम. भोसले यांनी आभार मानले. राजू प्रधान यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर , रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील उर्फ (भैय्या), श्रीपतराव पाटील, गणपतराव पाटील, महादेव पाटील, विष्णू पाटील, रणजीत पाटील, विजय पाटील, संतोष जाधव, बाळासाहेब कांबळे, संजय पाटील, सुनील कोळी, यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!