कुंभोज / प्रतिनिधी
कुंभोज येथील रयत शिक्षण संस्थेच्या समोरून जाणारा रस्ता,जो माळी मळा आणि सपकाळ मळा भागातील नागरिकांना जोडतो,सध्या अत्यंत खराब स्थितीत असून तो अक्षरशः ‘मृत्युचा सापळा’ ठरत आहे.या रस्त्याची दुरवस्था विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठे अडथळे निर्माण करत आहे.या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसाळ्यात स्थिती अधिकच बिकट होते.विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालय गाठताना व नागरिकांना दैनंदिन कामासाठी प्रवास करताना अपघातासारख्या घटना घडत आहेत. अपुऱ्या पथदिव्यांमुळे रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून चालणे धोकादायक ठरत आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.गेल्या दहा वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी आश्वासनांचे गोडवे गात मते घेतली
स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.गेल्या दहा वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी आश्वासनांचे गोडवे गात मते घेतली
, मात्र त्यानंतर आमच्या समस्यांकडे कोणीही लक्ष दिलेले नाही,असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.आमच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे,रस्त्यावरून सुरक्षितपणे चालता येणेही कठीण झाले आहे,”असे माळी मळा भागातील पालकांनी बोलताना सांगितले.या समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित प्रशासनाने रस्त्याची डागडुजी व पुनर्बांधणी करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.