काश्मीर येथील पर्यटकांवर केलेल्या भ्याड आल्याच्या निषेधार्थ शिरोली मध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकावर आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ लोकांचा मृत्यू झाला. त्या निषेधार्थ शिरोली मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करत या दहशतवाद्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.गेल्या दोन दिवसांपूर्वी काश्मीर येथे आतंकवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला.आतंकवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्याचे निषेधार्थ शिरोली मुस्लिम समाजाच्या वतीने जलादो जलादो पाकिस्तान जलादो, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत आसंमत दणदणून टाकला.या निषेध सभेवेळी ग्रामपंचायत सदस्य महंमद महात,सरदार मुल्ला,बालेचांद संदे यांची भाषणे झाली.

 

यावेळी डॉ. अन्वर गंजेली, मन्सूर नदाफ हिदायतुल्ला पटेल, मोईनुद्दीन मुल्ला ,उमर देसाई ,जमीर मुल्ला , मोहसीन देसाई,मुनेर संदे , सलीम संदे ,माणिक मुल्ला , अन्सार देसाई ,अस्लम संदे, सिकंदर संदे , सलीम पटापट ,शाहरुख देसाई,वासिम देसाई,उपस्थित होते.

error: Content is protected !!