पुलाची शिरोली येथील मार्बल मार्केट मध्ये रामनवमी उत्साहात साजरी

Spread the love

मार्बल मार्केट श्रीराम वाहतूक मालक संघ,सर्व मार्बल मार्केट दुकानदार हमाल संघटना याचे वतीने मार्केटमध्ये रामनवमी उत्साहात वाहतूक मालक संघ व हमाल संघटनेच्या वतीने श्रीराम नवमी उत्साहात साजरी श्रीराम वाहतूक मालक संघ तर्फे मार्बल मार्केट मधे मुर्ती पुजन व प्रसाद वाटप करणेत आला सर्व वाहतूक मालक असोसिएशन,मार्बल लाईन दुकादार,हमाल संघटना, कोल्हापूरचे सत्कार मुर्ती हिंदु नेता संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे,ॲड अमित कुमार भोसले याचे हस्ते प्रभु श्रीरामाची आरती करणेत आली.याप्रसंगी उपसरपंच बाजीराव पाटील , कृष्णात करपे (सरपंच प्रतिनिधी) संजय पाटील, योगेश खवरे यांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.बंडा साळुंखे,ॲड अमित कुमार भोसले , बाजीराव पाटील, माजी उपसरपंच सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे यांनी आपले मनोगते व्यक्त केले.यावेळी ॲड अमित कुमार भोसले आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे त्यांच्या विषयी आक्षपार्य वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही आणि खपवून घेतले नाही तसेच इथून पुढे तुम्ही सर्व तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी कोणतेही अक्षपार्य वक्तव्य खपवून घेऊ नका आपल्या हिंदू धर्म संस्कृतीची जपणूक करावी हिंदू सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जावे असे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे नियोजन मार्बल मार्केट श्रीराम वाहतूक मालक असोसिएशन तर्फे करणेत आले.सूत्रसंचलन विश्व हिंदु परिषद बजरंग दलाचे प्रशांत कागले यांनी केले.याप्रसंगी मनोज करपे ,उदय संकपाळ,अनिल पाटील, पंडीत चौगुले,रूषीकेश चौगुले,प्रदिप कागले ,अक्षय पाटील,सचिन पाटील, रावसाहेब पाटील ,सुनिल पाटील हे उपस्थित होते.

error: Content is protected !!