शिरोळ / प्रतिनिधी
दै.युवकांचा नवा महाराष्ट्र चे उपसंपादक, रोटरी हेरिटेज सिटी शिरोळ चे ट्रेझरर,निर्भीड पत्रकार रोटे.चंद्रकांत तुकाराम भाट( शिरोळ) यांना बसव धर्मपीठ कुडलसंगम ट्रस्टचे ‘जगद्गुरु अल्लमप्रभू योगपीठ,आळते’ यांच्यातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे.गेली २० वर्षे सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे पत्रकारितेचे व्रत चालवित आहेत.सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी,नागरीक यांच्या विविध प्रश्नांना लेखणीद्वारे वाचा फोडून न्याय मिळवून दिले आहे.
रोटरी हेरिटेज,विविध मंडळे यांमध्ये हिरिरीने भाग घेवून सामाजिक कार्यातही आपला कार्याचा ठसा उमटविलेला आहे.त्यांच्या कार्याची दखल घेवून बसवभूषण आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.दि.५व६ मार्च २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या लिंगायत गण मेळाव्यात प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्कार जाहीर होताच त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.