पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष बाटे हे होते प्रमुख पाहुणे शिवसूत्र तालमीचे संस्थापक अध्यक्ष विजय भोसले,शिवसेना शिरोली उपशहरप्रमुख नितीन दळवी , उद्योजक शंकर माने,विशाल पवार, पत्रकार कुबेर हंकारे हे प्रमुख पाहुणे होते.प्रथम विजय भोसले व नितीन दळवी यांच्या हस्ते ध्वजपुजन करण्यात आले श्रीफळ उद्योजक शंकर माने यांच्या हस्ते वाढण्यात आल. ध्वजवंदन पत्रकार कुबेर हकारे यांच्या हस्ते करण्यात यावेळीमान्यवरांचे स्वागत चेअरमन संतोष बाटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात.तदनंतर ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व समूह गीत गायन केले तसेच विद्यार्थ्यांनी देश भक्ती पर गीत गायले.त्यानंतर स्कूल मधील विद्यार्थ्यांनी
अत्यंत देशभक्तीने थोर समाज सुधारक क्रांतिकारक यांच्या विषयी इंग्रजी मराठी व हिंदीतून भाषण केली.
यावेळी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आजचे युग संगणकीय आहे आपल्या पाल्यांना पालकांनी आपल्या ला छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद यांच्यासारखे बुद्धीवान व कर्तुत्ववान होण्याचे ध्येय ठेवावे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष बाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा पाटील यांनी केले. स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. मनीषा बाटे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले त्यानंतर वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता मुलांना खाऊट वाटप करून करण्यात आली.कार्यक्रमाचे नियोजन प्रिन्सीपल सौ.मनिषा बाटे,व्हाईस प्रिन्सिपल प्रतिक्षा पाटील
या कार्यक्रमासाठी पुनम बागी,सारिका काळे,कविता कश्यप,मिनाक्षी पाटील,प्राजक्ता पाटील यांचे सहकार्य लाभले.