नरंदे येथे एक कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ – आ.अमल महाडिक

Spread the love

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथे आ.अमल महाडिक यांच्या निधीतून होत असलेल्या १ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. राजकुमार भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून गावाला हा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून गावातील अंतर्गत रस्ते, गटर्स, पाणंद रस्ते यांची कामे केली जाणार आहेत. उद्घाटन प्रसंगी आमदार अशोकराव माने, नरंदे गावच्या सरपंच पूजा कुरणे यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!