शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी संतोष बामणे तर उपाध्यक्षपदी संभाजी जाधव

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी संतोष बामणे तर उपाध्यक्षपदी संभाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर सचिवपदी महेश पवार व खजिनदार पदी विश्‍वास कांबळे यांच्याही निवड बिनविरोध करण्यात आल्या.बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब माळी हे होते.

 

 

 

शिरोळ येथील पंचायत समितीच्या सभागृहात शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सभा संपन्न झाली. यावेळी या निवडी करण्यात आल्या. स्वागत डॉ.दगडू माने म्हणाले, पत्रकारसंघाच्या वतीने येत्या काळात, पत्रकारांच्या समस्या व प्रश्‍न आग्रक्रमाने सोडवण्यास नविन कार्यकारणीने प्रयत्नशील रहावे. गेल्या 40 वर्षापासुन जेष्ठ पत्रकारांच्या माध्यमातुन पत्रकारांचे प्रश्‍न सोडण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगत येत्या काळात पत्रकार संघातील आम्ही सर्व जेष्ठ पत्रकार मार्गदर्शकाचे काम करू.

 

 

 

प्रास्ताविक करताना, जेष्ठ संपादक विजय पवार म्हणाले की, संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या माध्यमातुन राज्यातील पत्रकारांचे प्रश्‍न मार्गी लावले जातात. शिरोळ तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पत्रकार सभासद आहेत.सध्या राज्य शासनाने पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रते यांचे महामंडळही स्थापन केले असुन यात प्रत्येक पत्रकारांचा सहभाग व्हावा यादृष्टीने प्रयत्न केले जातील. नुतन पदाधिकार्‍यांनी शिरोळ तालुक्यातील पत्रकारांच्यासाठी कार्यशाळा, पुरस्कार, आरोग्य समस्या, व अन्य अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे अवाहन त्यांनी केले.

 

 

 

कार्यकारणी सदस्य पुढील प्रमाणे, चंद्रकांत भाट,संदिप इंगळे,सतिश पाटील, अतुल भोजणे, संतोष तारळे, सुरेश कांबळे, बाळासाहेब कांबळे, सागर कोळी तसेच सल्लागार समिती पुुढील प्रमाणे, विजय पवार, आनंदा शिंगे,डॉ.दगडू माने, बाळासाहेब माळी, डी.आर.पाटील, सुनिल इनामदार,अप्पालाल चिक्कोडे यांच्यासह अन्य जेष्ठ पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यावेळी शिरोळ तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!