पेठ वडगाव / प्रतिनिधी
वाठार बस स्थानक आणि पेठ वडगाव बस स्थानकामध्ये महिलांचे दागिने चोरणाऱ्या तीन चोरट्यांना पकडण्यात पेटवडगाव पोलिसांना यश
आले असून त्यांच्याकडून 45 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि कात्री जप्त करण्यात आली आहे.हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेटवडगाव बस स्थानक आणि वाठार बस स्थानक या ठिकाणी महिलांच्या हातातील आणि गळ्यातील सोन्याच्या दागिने चोरीस गेले होते याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दोन्ही एसटी स्टँड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे आदेश दिले होते. यावेळी दोन-तीन संशयित इसम स्टँड परिसरात फिरत असलेले दिसले होते. त्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या स्टॅन्ड परिसरात चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले.
यामध्ये सुरज सुरेश तिढंगे, व.व. ३२ रा. मुंबई,
गुड अल्बर्ट जोसेफ, व व ३२ रा. पिंपरी चिंचवड
आणि वत्वा गणेश गायकवाड, व.व.४४ रा. अंबरनाथ ठाणे यांच्याकडून 45 ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, आणि बांगड्या कातरण्याची कात्री जप्त केले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास भोसले,जितेंद्र पाटील, आबासो गुंडाके,तात्यासाहेब मुंडे, लखनराज सावंत,महेश गायकवाड, अनिल आष्टेकर यांचे पथकाने केलेली आहे.