शिरोळ ग्रामीण रुग्णालयात रक्ताची उलटी होऊन महिलेचा मृत्यू

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

येथील चुनाभट्टी जवळील श्रीमती उषा चंद्रमोहन शर्मा . (वय५२ वर्षे) या शिरोळ ग्रामिण रुग्णालय येथे शरीरातील कफ तपासणीसाठी गेल्या होत्या. यावेळी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कफ काढीत असताना अचानक त्या मोठ्याने खोकल्याने त्यांना रक्ताची जोरात उलटी होवुन तोंडातुन भरपुर रक्त आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला . हि घटना गुरुवार दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली . या बाबतची वर्दी ऋषीकेश रमेश कुलकर्णी रा. खिद्रापुर (ता शिरोळ ) यांनी शिरोळ पोलीसात दिली .
पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ऋषीकेश कुलकर्णी यांच्या सासु श्रीमती उषा चंद्रमोहन शर्मा यांना त्यांचा मुलगा स्वप्निल शर्मा हा कफ तपासणी करीता ग्रामिण रुग्णालय शिरोळ येथे घेवुन गेला होता. तेथील डॉक्टरांनी उषा शर्मा यांना कफ काढणेस सांगितले असता त्या रुग्णालयाच्या बाहेरील बाजुस कफ काढीत असताना त्यांना अचानक मोठ्याने खोकल्याने रक्ताची जोरात उलटी होवुन तोंडातुन भरपुर रक्त आल्याने श्रीमती उषा शर्मा या जागीच मयत झालेचे डॉक्टरांनी तपासुन सांगितले . यामुळे आकस्मीत मृत्यूची नोंद शिरोळ पोलीसात करण्यात आली आहे .

error: Content is protected !!