स्व.युसूफसाहेब मेस्त्री यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळे वाटप

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ दत्त साखर कारखान्याचे माजी संचालक स्वर्गीय युसूफसाहेब रसुलसाहेब मेस्त्री यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त शिरोळ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय युसूफसाहेब यांच्या कार्याची आठवण म्हणून रुग्णालयातील रुग्णांना फळे वितरित करण्यात आली.यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आणि मानसिक समाधान वाटले,स्वर्गीय युसूफसाहेब मेस्त्री यांच्या परिवाराचे ग्रामीण रुग्णालयातील उपस्थित मान्यवरांनी आभार व्यक्त केले.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने स्वर्गीय युसूफसाहेब यांच्या कार्याचे स्मरण ठेवण्यासाठी आजचा उपक्रम प्रेरणादायी ठरले असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.यावेळी फैजुला सय्यद,विकी शिंदे,हाजीमस्तान कुनुरे,वासिम मुल्लानी,जमीर रुकडे,साहील खलिफ, अबिद अलासे,कैफ आलासे,बबलू दबाशे,उबेद मिस्त्री, जुबेर अलासे,आरमान खालिफ,मुजमिल अलासे आणि हैदरअली मेस्त्री यांच्यासह स्थानिक नागरिकांची उपस्थित होते.

error: Content is protected !!