वडगाव येथील मुख्य बाजारपेठ वाहतूक समस्येवर आमदार अशोकराव माने यांची बैठक
वडगाव / प्रतिनिधी
पेठवडगाव येथील मुख्य बाजारपेठ व बसस्थानक चौकात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचे तात्काळ नियोजन करा. लोकांची गैरसोय होता कामा नये , अशा सूचना देत नवनिर्वाचित आमदार दलितमित्र अशोकराव माने बापूंनी आज प्रशासयासोबत चर्चा केली* .
पेठवडगाव बस स्थानक चौक,नगरपालिका चौक येथे गेली अनेक दिवस ऊस वाहतूक,जड वाहने व इतर वाहने यांची वाहतूक होऊन रस्त्याची झालेली दयनीय अवस्था यासह अतिक्रमणामुळे अनेक कारणांनी प्रचंड गर्दी होत असून *नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. ही बाब लक्षात येताच आमदार अशोकराव माने बापूंनी स्वतः जागेवर जाऊन प्रशासनाला तात्काळ यातून मार्ग काढत वाहतूक नियंत्रकासह मुख्य चौक, नगरपालिका चौक व बस स्थानक येथे नेहमी होणारा वाहतूक अडथळा दूर करण्याच्या सूचना दिल्या*. यावेळी प्रशासनासोबत चर्चा करून अतिक्रमण,पार्किंग शिस्त,हायमास्ट, डिव्हायडर तसेच संध्याकाळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक हवालदार उभा करणे व नागरिकांची हेळसांड थांबवावे अशाही सूचना आमदार माने यांनी दिल्या.
यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी सुमित जाधव, वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास भोसले,भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, भारतीय जनता पार्टी वडगाव शहर ज्येष्ठ नेते विजू भाई शहा, उपाध्यक्ष धनंजय गोंदकर, वडगाव शहराध्यक्ष जगन्नाथ माने अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी, युवा मोर्चा अध्यक्ष आप्पा माने, तानाजी ढाले, प्रज्योत शहा, युवराज वाळवेकर, विकास कांबळे, जगदीश महादार,राजू जाधव भाविक पटेल,दिनेश सनगर,सतीश घाटगे, संतोष सनगर विनय खराडे, पत्रकार राजकुमार चौगुले यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.