पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे । सहज हवन होते नाम घेता फुकाचे । जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
या सुभाषिताचा उल्लेख करायचं कारण म्हणजे पुलाची शिरोली येथील राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर व ओम दत्त चिले महाराज मंदिर येथील विशाल स्वरुपात वाटप होणारा महाप्रसाद..
या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी शिरोलीसह पंचक्रोशीतील भाविकांची प्रचंड गर्दी होते.
शिरोली पुलाची येथील नवीन धनगर वसाहत, अहिल्याईनगर येथील संत सद्गुरू बाळूमामा मंदिर व ओम दत्त चिले महाराज पालखी सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये दि.२८ डिसेंबर रोजी शिरोली मधील भजनी मंडळाचे भजन व रेणुका भक्त सर्जेराव पाटील यांच्या जागरणचा कार्यक्रम झाला,तसेच या निमित्ताने मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.श्री संत सद्गुरु बाळूमामा ओम दत्त चिले महाराज यांच्या स्मृतीस पहाटे पाच वाजता अभिषेक व आरती करण्यात येणार आहे तसेच दुपारी बारा वाजता पालखी मिरवणूक ही बाळूमामा मंदिरपासून साई मंदिर मार्गे ग्राम पंचायत ते म्हसोबा मंदीर या मार्गावरून मार्गस्थ होणार असून तेथून पुढे करपे गल्ली मार्गे गाव कामगार पाटील यांच्या वाड्या पासून सोनार वाडा मार्गे श्री काशिलिंग बिरदेव मंदीरा मध्ये येणार आहे.. तेथून सांयकाळी सहा वाजे पर्यंत पालखी बाळू मामा मंदीरा मध्ये दाखल होते..
त्या नंतर मंदीराच्या समोरील असणाऱ्या मंडपा मध्ये ढोल कैताळाच्या निनादात हेडाम खेळला जातो..नंतर श्री संत सद्गुरु बाळू मामा व ओम दत्त चिले महाराज यांची आरती होते..आरती झाल्यानंतर भव्य प्रमाणात वितरित होणाऱ्या महाप्रसादाला ३९ वर्षांपासूनची मोठी परंपरा आहे.या मंदिराविषयी एक आख्यायिका आहे
१९८४ साली बायक्का हिवरा गावडे यांच्या घरी या महाप्रसादाची सुरवात झाली.त्या नंतर कृष्णात सुबाजी पुजारी यांनी उद्धव पुजारी यांना १९९२ साली सांगीतले की अहिल्यादेवी नगर इथे बाळू मामाचे मंदिर बांधा व मुर्तिची प्रतिष्ठापणा करा.त्यानुसार लगेच मंदिर बांधकामास सुरुवात झाली व छोटेसे मंदिर बांधण्यात आले.त्यानंतर समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन मंदिराच्या जीर्णोद्धारा साठी दानशूर व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.आज हे मंदिर भव्य स्वरूपाचे आहे.याच मंदिराच्या समोर असलेल्या महाडीक हायस्कूल च्या भव्य पटांगणात महाप्रसादाचे वाटप होते. १९८४ साली सुरू झाला त्यावेळेस १०० लोकांचा महाप्रसाद करण्यात आला,आज रोजी इथं महाप्रसादाचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या ही सुमारे ३५ हजारांहून अधिक आहे .इतक्या भव्य स्वरूपात वाटप होणाऱ्या महाप्रसादासाठी १५०० किलो गहू तर १८०० किलो तांदूळ गुळ २०००किलो इतकं धान्य खर्ची पडते. आबालवृद्ध यांच्या सह पुरुष व स्त्रि भाविक यांची संख्या ही लक्षणीय असते.या महाप्रसादाचं संयोजक हे धनगर समाज यांच्या वतीनं केलं जाते. यांसाठी शिरोलीसरपंच, ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते गावांतील तरूण मंडळेसामाजिक कार्यकर्ते यांचे बहुमोल योगदान आहे.